भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तकात इस्रोचे माजी प्रमुख सिवन यांच्यावर गंभीर आरोप केले होते, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सोमनाथ यांनी हे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमनाथ यांनी वादाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक न प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या पुस्तकाचे नाव ‘निलावू कुडिचा सिम्हंल’ असे आहे. तर, इंग्रजीत या पुस्तकाचे नाव ‘लायन्स दॅट ड्रँक द मूनलाइट’ असे आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही संघटनेच्या उच्चस्थानी पोहोचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. एका महत्त्वाच्या पदासाठी अनेकजण पात्र होऊ शकतात. मी केवळ त्या बिंदूलाच समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी या पुस्तकात कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य केलेले नाही,’ असे सोमनाथ यांनी मुलाखतीत सांगितले.
हे ही वाचा:
माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा!
एल्विश यादव अटकेत नाही किंवा फरारीही नाही
आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!
इस्रायलच्या सैन्यांच्या श्वानांचा क्रूर हल्ला; हमासचे दहशतवादी ठार!
काही वृत्तांनुसार, सिवन यांनी सोमनाथ हे इस्रो प्रमुख होऊ नयेत, यासाठी अडथळे आणले होते. सोमनाथ यांनी इस्रोचे प्रमुख होऊ नये, असे सिवन यांना वाटत होते, असा आरोप सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तकात केल्याचे म्हटले जात आहे. या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर सोमनाथ यांनी वृत्तप्रतिनिधींना चांद्रयान-२ कसे अपयशी ठरले, याबाबत सांगितले होते.
चांद्रयान -२ मोहीम घाईघाईत राबवल्यामुळे अपयशी ठरले. जितक्या चाचण्या अपेक्षित होत्या, तितक्या झाल्या नव्हत्या. त्यांच्या पुस्तकात चांद्रयान २ मोहीम अपयशी ठरल्याचे खरे कारण नमूद केले होते. चांद्रयान २ मोहीम अपयशी ठरल्याची घोषणा करताना ज्या चुका झाल्या, त्या लपवण्यात आल्या होत्या, असा दावाही त्यांनी पुस्तकात केल्याचे सांगितले जाते.