लेखिका मंगला आठलेकर यांचे मत
अर्ज करून मिळविलेले पुरस्कार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आला की, सरकारचा निषेध म्हणून परत करणारे साहित्यिक खूपच तात्विक गोंधळ घालतात, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
पुरस्कारवापसी हे याचे उदाहरण आहे. पुरस्कार परत करायचे असतील तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बेंबीच्या देठापासून पाठपुरावा करणाऱ्या लेखकांनी मुळात आपले स्वातंत्र्य पुरस्काराच्या मोहात सरकारकडे गहाणच का टाकावे? असा परखड सवालही त्यांनी यावेळी केला.
संस्थेच्या पुरस्कार समितीने अनेक पुस्तकांतून निवडलेल्या पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने लेखकाचा सन्मान करतो. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे लाख रकमेचे राज्य सरकारचे पुरस्कार दाराशी चालत येत नाहीत. ध्यानीमनी नसताना ते असे सहज मिळत नाहीत, तर मिळवावे लागतात आणि त्यासाठी लेखकाला अर्ज करावा लागतो. खरंतर एखाद्या नोकरीसाठी किंवा आर्थिक मदतीसाठी फारतर सरकारी कोटय़ातून घर मिळावे याकरता अर्ज करावा लागणे इतपत ठीक आहे. परंतु आपण लिहिलेल्या पुस्तकाचा सन्मान व्हावा म्हणूनही साहित्यिकांनी अर्ज का करायचा असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा:
हिंदू-मराठी अधिकाऱ्याविरोधात षडयंत्र रचले जात असताना मुख्यमंत्री महोदय आपण गप्प का?
आता नवीन प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती निश्चित
२४ वर्षांची महिला बनली २१ मुलांची आई!
नवाब मालिकांविरोधात फौजदारी गुन्हा?
आठलेकर म्हणाल्या, परिषदेच्या पुरस्कारांचे विशेष हे की, मूळात हा पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज करावा लागत नाही. तसेच या पुरस्काराच्या निमित्ताने मिळणाऱ्या रकमेचा आकडा लाखाच्या घरातही नसतो. परंतु राजकारण्यांनी कधी मिरवण्यापलीकडे साहित्यात फारसा रस घेतला नाही असे परखड मत आठलेकर यांनी नुकतेच व्यक्त केले.