प्रख्यात साहित्यिक कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात धक्कादायक दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘औंरगजेबाच्या दोन राण्या होत्या. त्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या. त्यावेळी तिथं असलेल्या पंडितांनी राण्यांना भ्रष्ट केलं. त्यानंतर तिथं जी मोडतोड औरंगजेबाने केली, त्याला ज्ञानवापी म्हणून आता ओळखल जातं”, असा मोठा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभाचे शनिवारी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते पुस्तक वाचनाचे महत्त्व समजावून सांगत होते. पुस्तक वाचन केल्यामुळे आपल्याला इतिहासाबद्दल योग्य माहिती मिळत गेली, असे सांगत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील काही घटनांवर आपली भूमिका मांडली.
हे ही वाचा:
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’
नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप
ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर
मुंबईच्या समुद्रात बोड बुडाली, दोनजण बेपत्ता
सध्या ज्ञानवापी मशिदीचा परिसर पूर्वी मंदिर होता का, यावर सर्वेक्षण सुरू आहे. त्यातच नेमाडेंनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. काशी-विश्वेश्वर येथील पंडितांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या, असा आरोपही त्यांनी केला. नेमाडे म्हणाले की, औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. आल्याच नाही परत. छावणीतील लोक म्हणाले, गेल्या होत्या आल्या नाय परत. त्यानंतर ते चौकशी करायला गेले. तेव्हा तेथील जे पंडेल होते, ते तरुण बायकांना भुयारी मार्गातून नेऊन भ्रष्ठ करायचे. हे जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आले, तेव्हा ती ज्ञानवापीची मोडतोड झाली. तेव्हा त्याला असे वाटले की, असे जर हे पंडे असतील तर यांना साफ केले पाहिजे. तेव्हा इतिहासकारांनी अशी नोंद घेतली, की हा हिंदूद्वेष्टा होता.
सध्या इथे राहायचे कसं?
‘औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता. सध्या रोज बातम्या येतात, बायका भ्रष्ट केल्याच्या. तीनशे, साडे तीनशे लहान मुली पळवून नेल्या. सध्या इथे राहायचे कसे? हा प्रश्न आहे”, असे नेमाडे यावेळी म्हणाले. तुम्ही ग्रंथ, पुस्तके वाचली तर तुम्हाला सत्य समजेल, म्हणून ते वाचायला हवे. कुणाचे काही ऐकू नका तर वाचा. तुम्ही पुस्तके वाचली की कोण खरे बोलते? कोण खोटे बोलते? हे कळते”, असे भालचंद्र नेमाडे म्हणाले.