अफगाणिस्तनाने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपबाहेर काढले!

अफगाणिस्तानचा आठ धावांनी बांगलादेशवर विजय

अफगाणिस्तनाने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपबाहेर काढले!

क्रीडाविश्वात सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून अफगाणिस्तान संघाने बांगलादेशच्या संघाला नमवून टी-२० विश्वचषक २०२४ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. बांगलादेशचा ८ धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या या शानदार विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानला २० षटकात ५ बाद ११५ धावांचीच मजल मारता आली होती. पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचं आव्हान होतं. अफगाणिस्तानकडून सलामी फलंदाज गुरबाज याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर झदरन याने १८ धावा केल्या. तर कर्णधार राशीद खान याने नाबाद १९ धावा केल्या. इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही. बांगलादेशकडून गोलंदाज आर. हुसेन याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर टी. अहमद आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी एक-एक फलंदाज बाद केले.

त्यानंतर गोलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानने बांगलादेशला १८ व्या षटकांत १०५ धावांत रोखलं. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकनं बांगलादेशच्या चार विकेट घेतल्या. फाझलहक फारुकीनं एक विकेट घेतली. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खाननं चार विकेट घेतल्या. गलबदीन नैबनं एक विकेट घेतली. बांगलादेशकडून लिटन दासनं सर्वाधिक ५४ धावा करत सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला इतर फलंदाजांचे स्था मिळाली नाही. अफगाणच्या गोलंदाजीपुढं बांगलादेशच्या इतर फलंदाजांनी गुडघे टेकले. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अटीतटीची लढत सुरू होती. अखेर अफगाणिस्तानने बाजी मारत सामना खिशात घालत थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा:

यूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर

भारत टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत, ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या बाहेर जाणार?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!

भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!

अफगाणिस्तानच्या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचे टी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. सुपर ८ च्या ‘ग्रुप १’ मधून भारत, अफगाणिस्तान आणि ‘ग्रुप २’ मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील. तर, दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.

Exit mobile version