भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप अंतिम सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात भारतीय संघ फलंदाजीला उतरणार आहे.
याआधी, १९८३च्या वर्ल्डकपमध्ये आपण प्रथम फलंदाजी केली होती आणि वेस्ट इंडिजला मात दिली होती. २०११च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध प्रथम गोलंदाजी केली होती त्यामुळे आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत कशी कामगिरी करून दाखवणार याची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा:
मत्स्य विभाग करणार मत्स्यसाठ्याचे संवर्धन
नूंहमधील हिंसाचार टळला; अल्पवयीनांनी केली होती दगडफेक
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा
मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा
भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघा शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव ही भारतीय फळी आहे. तर ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल नाही.