आयसीसी टी२० पुरूष विश्वचषकातील आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन तुल्यबळ संघ आमने सामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्यात विजयाला नेमकी कोण गवसणी घालणार याकडे जगभरातीर क्रिकाट रसिकांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात विजयी होणार संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंड सोबत दोन हात करणार आहे.
आयसीसी टी२० पुरुष विश्वचषकात सध्या उपांत्य फेरीचा धडाका सुरु आहे. यामध्ये गुरुवार, ११ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. सुपर १२ फेरीच्या अ गटातून ऑस्ट्रेलिया संघ पुढे आला आहे. त्यांनी ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर ब गटातून पाकिस्तान संघ पुढे आला आहे. त्यांनी आपले सगळे साखळी सामने जिंकले आहेत.
हे ही वाचा:
ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर
WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…
राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…
मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट
त्यामुळे या दोन संघांपैकी अंतिम सामन्यात कोणता संघ पोहोचणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. दरम्यान पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडाक्यात एंट्री घेतली आहे. इंग्लंड सोबत झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी १६७ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले आणि अंतिम फेरी गाठली. अवघ्या १९ षटकातच न्यूझीलंड संघाने हा खेळ खल्लास केला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे २०१९ च्या विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवाचे उट्टे त्यांनी काढले असल्याचे म्हटले जात आहे.