ऑस्ट्रेलियाला नमविण्याची नामी संधी न्यूझीलंडने ५ धावांनी गमावली

हेड, राचिनची शतके, ऑस्ट्रेलिया अजूनही स्पर्धेत

ऑस्ट्रेलियाला नमविण्याची नामी संधी न्यूझीलंडने ५ धावांनी गमावली

ऑस्ट्रेलियाने केलेल्या ३८८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने३८३ धावांपर्यंत मजल मारली खरी पण त्यांना विजयाने हुलकावणी दिली. पाच धावांनी न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ट्राविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या १७५ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत ३८८ धावसंख्येपर्यंत मजल मारली. हेडने ६७ चेंडूंत १०९ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तर वॉर्नरने ६५ चेंडूंत ८१ धावा केल्या. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ८ गुण आहेत आणि ते चौथ्या स्थानी आहेत.

 

त्यानंतरचे फलंदाज मात्र उपयुक्त धावा करत राहिले. त्यामुळे अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने ३८८ धावसंख्येपर्यंत झेप घेतली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या या धावसंख्येला न्यूझीलंडनेही तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले. राचिन रवींद्रने ११६ धावांची खेळी आणि जिमी निशमने ५८ धावांची खेळी करून आपल्या संघाला स्पर्धेत ठेवले. वर्ल्डकपमधील राचिनची ही दुसरी शतकी खेळी होती.

न्यूझीलंडला अखेरच्या षटकात ६ चेंडूंमध्ये १९ धावांची गरज होती. तेव्हा मिचेल स्टार्कच्या त्या षटकात दुसरा चेंडू वाईड पडला. त्यातच यष्टीरक्षक जोश इंग्लिसच्या हातून चेंडू निसटला आणि सीमापार गेला. त्यामुळे न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १३ धावा हव्या होत्या. मात्र अखेरच्या षटकात शेवटी ६ धावांची गरज असताना लॉकी फर्ग्युसनला षटकार मारता आला नाही आणि न्यूझीलंडने सामना ५ धावांनी गमावला.

हे ही वाचा:

एशियन पॅरा गेम्समध्येही भारत ‘अबकी बार १०० की पार’

‘पुन्हा येईन’ व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांची उडवली खिल्ली

बद्रुद्दिन अजमल म्हणतात, ‘बलात्कार, लूट, दरोड्यात मुस्लिमांचा पहिला क्रमांक’

चक्क ‘हमास’च्या दहशतवाद्याने मलप्पुरमच्या नागरिकांशी साधला संवाद

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सलामीचा सामना गमावला होता पण त्यानंतर त्यांनी सलग चार सामने जिंकले आहेत. आता पुढील एका सामन्यात जरी त्यांना हार मानावी लागली तरी बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी त्यांना आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुढील लढती इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी आहेत. त्यामुळे त्यांना बाद फेरीत प्रवेश करण्याची नामी संधी आहे.

 

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर म्हणून हेड आणि वॉर्नर यांनी तडाखेबंद सुरुवात केली. त्यांनी ९.१३च्या गतीने धावा जमविल्या. वनडे क्रिकेटमधील ही सलामीच्या जोडीने केलेली सर्वात वेगवान अशी भागीदारी ठरली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रू यांनी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या १५९ धावांच्या खेळीला त्यांनी मागे टाकले.
ऑस्ट्रेलियाच्या हेडने अर्धशतक पूर्ण केले ते या स्पर्धेतील वेगवान अर्धशतक ठरले. २५ चेंडूंत त्याने हे अर्धशतक पूर्ण केले.

Exit mobile version