उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार, डेहराडून, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणांच्या नावांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. स्थानिक लोकांच्या भावना आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. याद्वारे, लोक भारतीय संस्कृती आणि तिच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊ शकतील.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बदलण्यात आलेल्या १५ ठिकाणांच्या नावांची यादी पोस्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूर आता ‘शिवाजी नगर’ म्हणून ओळखले जाईल. बहादराबाद ब्लॉकमधील गाजीवलीचे नाव बदलून ‘आर्य नगर’, चांदपूरचे नाव बदलून ‘ज्योतिबा फुले नगर’, नरसन ब्लॉकमधील मोहम्मदपूर जाटचे नाव बदलून ‘मोहनपूर जाट’, खानपूर कुरसालीचे नाव बदलून ‘आंबेडकर नगर’, खानपूर ब्लॉकमधील इद्रिशपूरचे नाव बदलून ‘नंदपूर’, खानपूरचे नाव ‘कृष्णपूर’ आणि अकबरपूर फजलपूरचे नाव बदलून ‘विजयनगर’ असे करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
संसदेत वक्फ विधेयक मांडण्याची प्रक्रिया सुरू, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार!
मुरलेल्या फडणवीसांना पक्के ठाऊक आहे, चर्चेतील नाव यादीत नसते…
ममता जी ‘कौन सा धर्म गंदा है’?
बीड कारागृहात टोळीयुद्ध? वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण?
देहरादून महानगरपालिकेतील मियांवाला हे ‘रामजीवाला’, विकासनगर ब्लॉकमधील पीरवालाचे ‘केसरी नगर’, चांदपूर खुर्दचे ‘पृथ्वीराज नगर’, सहसपूर ब्लॉकमधील अब्दुल्लापूरचे ‘दक्षिणनगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच नैनिताल जिल्ह्यातील नवाबी रोडचे नाव बदलून ‘अटल मार्ग’ करण्यात आले आहे. पंचक्की ते आयटीआय पर्यंतच्या रस्त्याला ‘गुरु गोवळकर’ मार्ग असे नाव देण्यात आले आहे. यासह उधम सिंह नगर जिल्ह्यातील नगर पंचायत सुलतानपूर पट्टीचे नाव बदलून ‘कौशल्या पुरी’ असे करण्यात आले आहे.
हरिद्वार जनपद का औरंगज़ेबपुर अब शिवाजी नगर के नाम से जाना जाएगा…
जनभावनाओं के अनुरूप हरिद्वार, देहरादून, नैनीताल और उद्धम सिंह नगर जनपदों में स्थित विभिन्न स्थानों के नाम परिवर्तित किए गए हैं। pic.twitter.com/4Vp5pEocmI
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) March 31, 2025