27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले'

‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हेमंत सरकारवर जोरदार हल्ला

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर) हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आलमगीर आलम यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबशी केली. कोडरमा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी यांनी झामुमोवर (झारखंड मुक्ती मोर्चा) विकासाच्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आणि त्यांच्या सरकारच्या अंतर्गत माफियांना आश्रय दिल्याचा आरोप केला.

सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, कोडरमा हे नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. ही भगवान बिरसा मुंडा यांची पवित्र भूमी, शहीदांची भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी कोडरमा येथील एक नव्हे तर चार हुतात्म्यांनी आपल्या बलिदान दिले होते. पण आज झारखंडमध्ये चाललंय तरी काय?, ‘एक आलमगीर आलम होता औरंगजेब, ज्याने देशाला लुटले होते. देशाच्या पवित्र मंदिरांना त्याने नष्ट केले होते आणि दुसरा झारखंड मुक्ती मोर्चाचा एक मंत्री आलमगीर, ज्याने झारखंडच्या गरिबांचे पैसे लुटले’, त्यांच्या सेवकांच्या, परीवारांच्या घरी नोटांचे बंडल कसे सापडले, हे पाहिलच आहे.

हे ही वाचा : 

२०३६ चे ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स भारतात होणार?

सलमान खानला धमकी देऊन पाच कोटींची मागणी करणाऱ्याला कर्नाटकातून अटक

शरद पवार घेणार राजकीय निवृत्ती?

‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, म्हणूनच मी येथे आलो आहे. भगिनींनो आणि भावांनो, विकासाच्या नावाखाली ज्यांनी तुमची फसवणूक केली, त्यांना प्रत्युत्तर देण्याची ही निवडणूक संधी आहे, जिथे जिथे भारतीय जनता पक्षाची सरकारे आहेत, त्यांनी विकासाचा आदर्श आणि वारसा दिला आहे.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसने अनेक वर्ष देश चालवला. परंतु, यातील एकाने तरी गरिबांसाठी एक तरी योजना चालू केली?. २०१४ साली नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा मिडीयाने त्यांना तुमचा अजेंडा काय असे विचारले होते. यावर पंतप्रधान मोदींनी एका ओळीत सांगितले, ‘सबका साथ, सबका विकास’.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा