उद्धव ठाकरेंचे नवे आराध्य दैवत औरंगजेब, मातोश्रीमध्ये फोटोही दिसेल!

शिवसेना नेते संजय निरुपम यांची उबाठावर जोरदार टीका

उद्धव ठाकरेंचे नवे आराध्य दैवत औरंगजेब, मातोश्रीमध्ये फोटोही दिसेल!

करीना आणि सैफ देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा त्यांना तैमूरची जास्त काळजी वाटत होती असे आज संजय राऊत म्हणाले. मला माहित नाही की ही माहिती त्यांना स्वतः तैमूरने दिली होती की करीनाने. पंतप्रधानांना तैमुरची काळजी वाटली कि नाही ते माहिती नाही पण संजय राऊत यांना महाराष्ट्रातील दंगल खोरांची खूप काळजी आहे असे दिसून येते, असे शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले. यावेळी त्यांनी उबाठावर जोरदार टीका केली.

संजय निरुपम म्हणाले, नागपूरच्या दंगलीमध्ये हिंदूंचा हात असल्याचे संजय राऊत म्हणाले. याचा निषेध करत प्रश्न करतो की, उबाठावाले आता मुजाहिद्दीनसोबत आहेत का?. नागपूर हिंसाचारातील आरोपींची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पाठ राखण करत आहेत, महाराष्ट्र यांना माफ करणार नाही. हे आता एकदम हिंदू विरोधी झाले आहेत.

उद्धव ठाकरेंचे नवे दैवत हे औरंगजेब झाले आहेत. मातोश्रीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला औरंगजेबचा फोटो लावलेला लवकरच दिसेल, असे संजय निरुपम म्हणाले. जर त्यांनी मुस्लिम मतांसाठी लाचार होऊन अशा प्रकारे आपला कार्यक्रम सुरू ठेवला तर त्यांना विधानसभेपेक्षाही मोठा धक्का बसेल, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा : 

बिहार निवडणुकीसाठी २६ मार्चला एनडीए नेत्यांची बैठक

गुन्हेगारी घटना चिंतेचा विषय, भविष्यात सुधारणा आवश्यक

कर्नाटक : १५० फुटी रथ कोसळून एका भाविकाचा मृत्यू!

१० वर्षात भारताचा जीडीपी दुप्पट

संजय निरुपम पुढे म्हणाले, नागपूर दंगलीबाबत शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका आहे की दंगलखोरांची मालमत्ता जप्त करून विकली पाहिजे किंवा त्यांच्यावर बुलडोझर चालवला पाहिजे. दरम्यान, नागपूर दंगली प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दंगल खोरांवर कडक कारवाई करण्यात येणार असून नुकसान भरपाई देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण | Dinesh Kanji | Sameer Wankhede | Disha S

Exit mobile version