टाटा इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या सिजनसाठी बँगलोर येथे सध्या मेगा ऑक्शन सुरु आहे. दुपारी १२ वाजल्यापासून या मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. मात्र, या लिलावादरम्यान एक धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे.
ऑक्शन सुरु असताना लिलाव पुकारणारे ह्यू एडमीड्स यांना चक्कर येऊन ते अचानक कोसळले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मेडिकल इमरजन्सी निर्माण झाल्यामुळे ऑक्शन प्रक्रिया थांबवण्यात आली. श्रीलंकेचा खेळाडू वानिडू हसरंगा याला संघात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये चढाओढ होत असतानाच ही घटना घडली.
Oh dear
Auctioneer has collapsed#IPLAuction #IPLMegaAuction2022 #IPL2022Auction pic.twitter.com/HEGSzBvRmI— ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎ ︎︎ ︎ (@Soulxslayer8) February 12, 2022
मात्र, आता ह्यू एडमीड्स यांची प्रकृती स्थिर असून लिलावाची पुढील प्रक्रिया ३.३० वाजता सुरू होणार आहे. २.३० ते ३.३० हा जेवणाचा वेळ असल्याने सर्व फ्रँचायझी मालक आणि संबंधित लोक जेवणासाठी गेले आहेत.
हे ही वाचा:
‘राऊत आणि परबांसाठी अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाइज कराव्यात’
हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त
‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’
ह्यू एडमीड्स हे मूळचे ब्रिटीश ऑक्शनर आहेत. त्यांचे वय ६३ आहे. आतापर्यंत झालेल्या लिलावात श्रेयस अय्यरला मोठी रक्कम मिळाली असून मार्की प्लेयरमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय सुरेश रैना आणि स्मिथ हे दोघे अनसोल्ड राहिल्याचे पाहायला मिळाले. हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल यांनाही चांगला भाव मिळाला आहे.