३३३ खेळाडूंपैकी कोण घेणार कोटी कोटी उड्डाणे

आज दुबईत आयपीएलचा लिलाव

३३३ खेळाडूंपैकी कोण घेणार कोटी कोटी उड्डाणे

इंडियन प्रीमियर लीग हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक महत्त्वाचा सोहळा बनला आहे. मंगळवारी आयपीएलच्या २०२४च्या अध्यायासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दुबईतील कोका कोला एरेना येथे दुपारी १ पासून ही लिलावप्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे अख्ख्या जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे.

स्टार स्पोर्ट्सवर या लिलावाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

या लिलावाची वैशिष्ट्ये अशी

 

किती खेळाडूंची नोंदणी

बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे ११६६ खेळाडू हे या वर्षीच्या लिलावासाठी नोंदणी केलेले आहेत.

 

किती खेळाडूंचा प्रत्यक्ष होणार लिलाव

यावेळी ३३३ खेळाडूंचा लिलाव होणार असून त्यात २१४ हे भारतीय खेळाडू आहेत तर ११९ खेळाडू हे परदेशी आहेत. ११६ खेळाडूंनी आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व केलेले असून २१५ खेळाडू हे आतापर्यंत देशाचे प्रतिनिधित्व केलेले नाहीत. दोन खेळाडू हे सहसदस्य असलेल्या देशांचे खेळाडू आहेत. १० संघांतील ७७ जागा भरायच्या आहेत. त्यातील ३० जागा या परदेशी खेळाडूंसाठी असतील.

 

लिलावाची प्रक्रिया

खेळाडूंची विभागणी १९ गटात होत असून त्यात फलंदाजी, अष्टपैलू, वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, यष्टिरक्षक अशी त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे.

 

खेळाडूंची मूलभूत किती रक्कम?

या खेळाडूंपैकी २३ खेळाडूंना सर्वाधिक मूलभूत रक्कम देण्यात आली आहे. ती असेल २ कोटी. त्यानंतर त्यांची बोली लागेल. त्यात मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड, उमेश यादव, शार्दुल ठाकूर अशा खेळाडूंचा समावेश आहे. १३ खेळाडूंना १.५ कोटींची मूलभूत रक्कम आहे.

हे ही वाचा:

गोरंट्याल फसले; तो सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला!

लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!

तीस साल बाद???? मृत्यूची बातमी की अफवा?

एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

 

१० संघांकडे राहिलेली रक्कम

चेन्नई ३१.४ कोटी

डेक्कन चार्जर्स २८.९५ कोटी

गुजरात टायटन्स ३८.१५ कोटी

कोलकाता ३२.७ कोटी

लखनऊ १३.१५ कोटी

मुंबई १७.७५ कोटी

पंजाब २९.१ कोटी

बेंगळुरू २३.२५ कोटी

राजस्थान १४.५ कोटी

हैदराबाद ३४ कोटी

 

कोण करणार लिलाव?

मल्लिका सागर यांच्या देखरेखीखाली ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला लिलावाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

 

Exit mobile version