अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती  

अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती  

डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मराठमोळ्या अतुल राणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते.

अतुल राणे हे १९८७ पासून मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्यटरचे स्वदेशी डिझाईन बनवणे, त्या विकसित करणे, सिस्टीम ऍनॅलिसीस, लूप सिम्युलेशन स्टडीज, मिशन सॉफ्टवेअर, डिफेन्स ऍप्लिकेशनच्या तंत्रज्ञानामध्ये योगदान देत आहेत.

अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील असून रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांच मूळगाव आहे. शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी चेन्नई मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर त्यांनी पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये सेवासाठी रुजू झाले.

हे ही वाचा:

लोकशाहीचे ‘बारा’ वाजवू नका

आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो

चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी

काय म्हणता, आता टीव्हीमधून पदार्थांची चव घेता येणार?

अतुल राणे यांनी त्यांच्या कारकिर्दीला डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात विकसत होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि- १ मिसाईलच बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचे नेतृत्त्व केले. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे सदस्य आहेत.

Exit mobile version