अतुल भातखळकरांची ‘विजय संकल्प रॅली’, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा सहभाग!

हजारो दुचाकी -हजारोंच्या संख्येने लोक रॅलीत सामील

अतुल भातखळकरांची ‘विजय संकल्प रॅली’, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा सहभाग!

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांची आज (१८ नोव्हेंबर) ‘विजय संकल्प रॅली’ (बाईक रॅली) पार पडली. या विजय संकल्प रॅलीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी मुख्यमंत्री यादव यांनी अतुल भातखळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अतुल भातखळकर यांनी २४ ऑक्टोबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत कांदिवलीत १६ हून अधिक रथयात्रा, २० पदयात्रा, असंख्य स्थानिक भेटी आणि संवाद, ३जाहीर सभा, खुल्या चर्चा अशा सर्व माध्यमांतून प्रचार केला. भोजपुरीचे सुपरस्टार मनोज तिवारी, रवि किशन, दिनेश लाल यादव उर्फ निराहुआ सौराष्ट्राचे कविराज लोकसाहित्यकार राजबा गढवी यांनीही अतुल भातखळकरांच्या समर्थात प्रचार केला. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी देखील अतुल भातखळकरांच्या समर्थनार्थ प्रचार रॅली काढत निवडून आणण्याचे आवाहन केले.

आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अतुल भातखळकरांसाठी आयोजित भव्य विजय संकल्प रॅलीला भाजपा-महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. हजारो दुचाकी आणि हजारोंच्या संख्येने लोक या बाईक रॅलीत सामील झाले होते. मतदारांनी बाईक रॅली दरम्यान ‘कहो दिल से अतुलजी फिरसे’, ‘देख लो आँखों से कमल खिलेगा लाखों से’ अश्या घोषणा दिल्या. यावेळी अतुल भातखळकरांनी निवडणूकीच्या प्रचारात योगदानासाठी कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले.

हे ही वाचा : 

खर्गेंच्या जिल्ह्यात सोयाबीनला भाव ३,८०० रु आणि काँग्रेस म्हणते, महाराष्ट्राला सात हजार देवू!

‘कुणी प्रश्न विचारायचे त्या पत्रकारांची यादी, राहुल गांधींच्या परिषदेत तयार होती’

उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याला अटक!

दरम्यान, अतुल भातखळकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की त्यांना प्रचारात जनतेकडून अलोट आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मी निवडणूक फार गांभीर्याने घेतो, तरी आमची स्पर्धा ही गेल्यावेळपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवण्याची आहे. ‘काहो दिल से, अतुलजी फिरसे’ हा लोकांनी दिलेला नारा आहे. कार्यकर्त्यांनीसुद्धा मोठ्या संख्येने आणि उत्साहाने काम केलं आहे. त्यामुळे विजय निश्चित असल्याचे भातखळकरांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, ‘दहा वर्षांत माझा फोन नंबर बदलला नाही तसा माझ्यातही कोणता बदल झालेला नाही. मी याआधी जसे लोकांची कामं करत होतो तसेच पुढे पाच वर्ष करत राहणार आहे. असा विश्वास मी तुम्हांला देतो.’ यासोबतच त्यांनी मतदारांना २० नोव्हेंबरला न चुकता मतदान करावं असं आवाहन केलं.

 

Exit mobile version