23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषगरबा कार्यक्रम प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीच्या मागणीला अतुल भातखळकरांचा पाठींबा

गरबा कार्यक्रम प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीच्या मागणीला अतुल भातखळकरांचा पाठींबा

लव्ह- जिहादसारखे प्रकार रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मागणी

Google News Follow

Related

देशभरात वाढती लव्ह- जिहादची प्रकरणे लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषदेच्यावतीने नवरात्रोत्सवादरम्यान महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. लव्ह- जिहादसारखे प्रकार रोखण्यासाठी गरबामध्ये प्रवेश देताना आधार कार्ड तपासा आणि प्रत्येकाच्या डोक्यावर टीळा लावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पाठींबा दिला आहे.

नवरात्रोत्सवात राज्यासह देशभरात गरब्याचे आयोजन केले जाते. सर्वच वयोगटाचे उत्साही मंडळी गरबा खेळण्यासाठी जात असतात. अशावेळी अनेकदा गर्दीच्या ठिकाणी तरुणींच्या छेड काढल्याच्या घटना घडतात. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केली आहे जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून फक्त इव्हेंट नाही. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यांना प्रवेश दिला जाऊ नये. गरबा उत्सवात देवीबद्दल भक्ती नसतानाही अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला, तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे. यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला पूर्ण समर्थन असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

पवन कल्याण म्हणतात, सनातन धर्म प्रमाणपत्र हवे!

लाडू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या देखरेखीखाली करणार एसआयटी

पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार, राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक!

नसरल्लानंतर हिजबुल्लाचा संभाव्य नवा प्रमुख हाशिम सफिद्दीनला टिपले

गरबा उत्सवात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासणे आणि या व्यवस्थेसाठी आयोजन मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विश्व हिंदू परिषद आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गरबा सणात फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विहिंप आणि बजरंग दलाकडून केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा