उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून खोटे बोलत होते, हे सिद्ध झाले!

आमदार अतुल भातखळकर यांची घणाघाती टीका, उद्धव यांच्या मुलाखतीवर दिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून खोटे बोलत होते, हे सिद्ध झाले!

उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात एक दावा केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली. त्यासंदर्भात भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी त्या मुलाखतीत असा दावा केला होता की, आदित्य ठाकरेंना आपण मुख्यमंत्रीपदासाठी तयार करू आणि आपण दिल्लीला जाऊ असे देवेंद्र फडणवीस आपल्याला म्हणाले होते.

यावरून भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा उघड झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे हताश आणि भ्रमिष्ठ आहेत. बरे झाले आज आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नव्हतं हे त्यांनी मान्य करून टाकलं. कारण आदित्य ठाकरे यांना फडणवीस ‘ग्रूम’ करणार होते याचा अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते मग काय एका क्षणात आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार होते की काय़?

त्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून खोटं बोलत आहेत त्यावर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असेही भातखळकर म्हणाले. त्यांनी सांगितले की, आदित्य ठाकरेंना ग्रूम करण्यासाठी दोन वर्षे लागली असती. मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं हे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्यही खोटं ठरलं. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे होते हे सिद्ध झाले. २०१९मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांशी जो दगाफटका केला तो त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि आपल्या मुलाच्या फायद्यासाठी हा आमचा आरोप होता, तो आज उद्धव ठाकरेंनी मान्य केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आज ते उघडे पडले आहेत.

हे ही वाचा:

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान

आमदार भातखळकर म्हणाले की, आदित्यना जर ग्रूम करायचे होते ते एका क्षणात होणे शक्य नव्हते. २०१९ला सत्ता आली. वर्ष दीड वर्ष तरी लागले असते आदित्य ठाकरेंना ग्रूम करण्यासाठी. अर्थात आदित्य ठाकरेंची बौद्धिक क्षमता लक्षात घेता दोन चार वर्षेही कमीच पडली असती. म्हणजेच २०१९ला मुख्यमंत्री फडणवीस होणार होते. यामुळे उद्धव ठाकरे बोलत होते ते खोटं होतं.

उद्धव ठाकरेंनी केलेला दावा हा खरा आहे असे गृहित धरून मी बोलत आहे. फडणवीसांना आणि त्यांना जनतेने आशीर्वाद दिलेला असताना त्यानी वचन का पाळले नाही? पण तेव्हा जे कारण ते सांगत होते ते खोटे आहे. महाराष्ट्रातील जनता ठरवते कुणाला मुख्यमंत्री करायचे ते.

Exit mobile version