नसरल्ला समर्थकांनो… कॅण्डल मार्च काढून काय होणारे त्यापेक्षा बांधवांसोबत जाऊन लढा

नसरल्ला समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांना अतुल भातखळकरांचा खोचक सल्ला

नसरल्ला समर्थकांनो… कॅण्डल मार्च काढून काय होणारे त्यापेक्षा बांधवांसोबत जाऊन लढा

इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह मारला गेला. यानंतर अनेक ठिकाणी आनंद साजरा केला गेला आहे तर काही देशांमध्ये मातम केला जात आहे. भारतातही काही ठिकाणी नसरल्लाला ठार केल्यानंतर निषेध मोर्चे काढण्यात आले. जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हिजबुल्लाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केवळ पुरुषच नाही तर मोठ्या संख्येने महिलाही निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.

अशातच उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथेही शिया मुस्लीम समुदायाच्या लोकांनी नसरल्लाच्या मृत्यूच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च काढत घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने महिला, पुरुष, ज्येष्ठ आणि लहान मुले यात सामील झाली होती. यावेळी हर घर से नसरल्ला निकलेगा अशा घोषणा देण्यात येत होत्या. तर, इस्रायल विरोधाही नारेबाजी केली जात होती. यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी हे असले मोर्चे काढणाऱ्यांना खडेबोल सुनवत खोचक सल्लाही दिला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “कॅण्डल मार्च काढताय, हर घर से नसरल्ला निकलेगा अशा घोषणा देतायत, अरे जा की तिथे, आपल्या बांधवांसोबत लढा. बिळात लपलेल्या खोमेनीलाही दिलासा मिळेल. इथून इस्रायलला शिव्या घालून काय होणार?” असा खोचक सल्ला त्यांनी नसरल्ला समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांना दिला आहे.

हे ही वाचा:

बदलापूर प्रकरण: महिनाभरानंतर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना ठोकल्या बेड्या

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना इस्रायलमध्ये बंदी

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ – वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्

भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला

इस्रायलने अधिकृतपणे हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. आयडीएफनेही हसन नसरल्ला यापुढे जगाला दहशत माजवू शकणार नाही, असे म्हटले होते. हिजबुल्ला दहशतवादी संघटनेचा नेता आणि त्याच्या संस्थापकांपैकी एक हसन नसरल्ला, हिजबुल्लाच्या दक्षिण आघाडीचा कमांडर अली कार्की आणि अतिरिक्त हिजबुल्ला कमांडरसह बॉम्बस्फोट कारवाईत ठार झाले. हवाई हल्ल्यांनंतर आयडीएफच्या सूत्रांनी सांगितले होते की स्ट्राइकमध्ये हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाला लक्ष्य केले गेले होते, जो त्यावेळी कमांड सेंटरमध्ये होता. यानंतर इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली होती.

Exit mobile version