राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. पक्षांकडून उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत. याच दरम्यान, मविआने महायुतीवर मतदान यादीमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप निवडणूक यादीमध्ये घोटाळे करत आहे, असा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊतांच्या आरोपावर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली. भाजप ईव्हीएम सेट करत असेल तर त्याला मतदार यादीत घोटाळा करण्याचे कारणच काय?, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएला यश मिळाल्याने इंडी आघाडीचे नेते बिथरून गेले होते. त्यावेळी जनतेला खोटी आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करण्यात इंडी आघाडीच्या नेत्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. संपूर्ण देशाला याची जाणीव आहे की, देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, मात्र भाजपा सरकार आले तर संविधान बदलतील, अशा खोट्या अफवा पसरवल्या. परंतु, ज्या प्रकारे निकाल लागला त्याने इंडी आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळूच सरकली. त्यामुळे विरोधकांकडे काहीच पर्याय नसल्याने त्यांनी एव्हिएम मशीनवर बोट ठेवत, ईव्हीएम सेट केल्यामुळे भाजप विजयी झाला, असा आरोप केला.
हे ही वाचा :
शिमलामधील संजौली मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरू
जम्मू काश्मिरात कामगारांची हत्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ने घडवली!
एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण न करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी
आता राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून विरोधकांनी भाजपवर आरोप करण्याचा पुन्हा रेटा लावला आहे. मतदार यादीत घोळ होत असल्याचे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार बावनकुळे असल्याचे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या आरोपावर बावनकुळे यांनी प्रत्युतर देत म्हणाले, राऊतांना पराभव दिसत असल्याने आरोप करत असल्याचे म्हटले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील संजय राऊतांवर टीका केली. भाजप ईव्हीएम सेट करत असेल तर त्याला मतदार यादीत घोटाळा करण्याचे कारणच काय?, असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला. पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे सर्वज्ञानी संपादकांचे मानसिक संतुलन बिघडलेले असावे, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला.
भाजप ईव्हीएम सेट करत असेल तर त्याला मतदार यादीत घोटाळा करण्याचे कारणच काय?
पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे सर्वज्ञानी संपादकांचे मानसिक संतुलन बिघडलेले असावे. pic.twitter.com/6DUKVbvW5m— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 21, 2024