25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबोरिवलीतील दांपत्याच्या मृत्युस पालिकेतील शिवसेनेचे नेतृत्व जबाबदार

बोरिवलीतील दांपत्याच्या मृत्युस पालिकेतील शिवसेनेचे नेतृत्व जबाबदार

Google News Follow

Related

बोरिवलीतील नॅशनल पार्क जवळच्या फ्लायओव्हरवर एका दांपत्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर त्यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पालिकेच्या कारभारावर खरपूस टीका केली आहे. या दुर्दैवी प्रकाराला मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे नेतृत्व जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.

आमदार भातखळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पालिकेतील ३२ इंजीनियरना निलंबित केले होते. तर काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. पण गेल्या अडीच वर्षांत या ३२ इंजीनियरना कामावर घेण्यात आलेच शिवाय त्यांना बढतीही देण्यात आली. काळ्या यादीतील या कंत्राटदारांना व्हाइट लिस्टमध्ये टाकण्यात आले. या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. या दांपत्याचा सहा वर्षांचा मुलगा आहे.त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पालिकेने घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचे टेंडर काढण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिलेत. त्यामुळे जिथे आवश्यक असेल तिथे सीमेंट कॉंक्रिटचे रस्ते होतील. खड्डे भरण्यासाठी एजन्सीची निर्मिती केली गेली आहे, अशी माहितीही भातखळकर यांनी दिली.

हे ही वाचा:

ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली

हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

रंगीत पणत्यातून साकारला ५० फुटी बाप्पा

बांगर यांचं चुकलंच; पण सत्तेचा माज जुनाच!

बीड प्रकरणी खुनाचा गुन्हा खटला चालवा

अतुल भातखळकर यांनी बीडमधील घटनेवरही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, बीडमध्ये जूनमध्ये जी घटना घडली त्यात गर्भवतीचा गर्भपात गोठ्यात केला गेला. त्यात तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यासंदर्भात गेल्या सरकारने काही खटले दाखल केलेत. पण डॉक्टरांना अटक करण्यात आलेली नाही. बाकीच्यांना अटक केली, पण कलमे चुकीची आहेत. गोठ्यात गर्भपात करणे हा खुनाचा प्रकार आहे. जे दोषी आहेत त्यांच्याविरोधात विशेष न्यायालयात ३०२ अंतर्गत खुनाचा खटला चालविला पाहिजे. लिंगनिदान किंवा गर्भपातासारख्या असल्या घृणास्पद कृत्यांना जरब बसली पाहिजे.

शिवसेनेचे थरच राहिलेत कुठे?

शिवसेनेचे थर गडगडणार नाहीत, या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी केलेल्या विधानावर आमदार भातखळकर म्हणाले की,  गडगडणार नाहीत हे बरोबर आहे. थर राहिलेत कुठे? भ्रष्टाचारामुळे जे खड्डे पडलेत त्यात ते पडले आहे. त्यांनी एवढे लक्षात ठेवावे त्यांची मस्ती, भ्रष्टाचार, त्यांचा उर्मटपणा याला पालिकेच्या निवडणुकीत उत्तर देणार आहे. भातखळकर यांनी असेही सांगितले की, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने भ्रष्टाचाराची हंडी जी गेली ३० वर्षे उभी केली होती. मातोश्री जी त्यातील मलई, लोणी मिटक्या मारत खात होते, ती हंडी आम्ही फोडणार आहोत. मुंबईला १२ तास पाणी, उत्तम रस्ते, आरोग्य व्यवस्था, कचरामुक्त मुंबई याची हंडी आम्ही लावली आहे. ती हंडी सव्वा करोड जनतेच्या मदतीने भाजपा फोडेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा