29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषअतुल भातखळकर २४ तास जनतेची सेवा करणार नेता, पुन्हा निवडून येण्याची खात्री!

अतुल भातखळकर २४ तास जनतेची सेवा करणार नेता, पुन्हा निवडून येण्याची खात्री!

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, आर.पी.आय महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कांदिवलीत पूर्वेत प्रचारयात्रांमध्ये अतुल भातखळकरांची सतत वाढणारी लोकप्रियता आणि दहा वर्षांत झपाट्यानं केलेली कामं त्यांच्या शिदोरीला आहेत. दरम्यान सोमवारी (११ नोव्हेंबर) वार्ड क्र. २८-२९ मध्ये सायंकाळी आयोजित रथयात्रेत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. अतुल भातखळकर २४ तास जनतेची सेवा करणार नेता, पुन्हा निवडून येण्याची खात्री असल्याचे मंत्री पियुष गोयल म्हणाले.

उत्तर मुंबईचे खासदार आणि कॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांनी रथयात्रेत अतुल भातखळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “कांदिवली वासियांनी मला खुप प्रेम दिलं आहे. या लोकसभेला कांदिवली पूर्वच्या मतदार राजाने मला ७० हजार मतांची बढत दिली होती. इथे अतुलजींसारखा २४ तास जनतेची कामं करणारा नेता पुन्हा निवडून येईल याची आम्हांला खात्री आहे. त्यांनी या मतदार संघात खऱ्या अर्थाने विकास केला आहे. त्यामुळे अतुल भातखळकरांचा विजय कांदिवली पूर्व मतदारसंघाचा विजय आहे. पण आता आम्हांला त्यांना फक्त निवडून आणायचं नाही. रिकॉर्ड मार्जिनने निवडून आणायचे असल्याचे मंत्री गोयल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात डबल इंजीनचं सरकार आणायचं आहे. यासाठी अतुलजींना आपल्याला सव्वा लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करायचं आहे आणि म्हणून कांदिवली पूर्वमध्ये ‘शतप्रतिशत मतदान’ घडवून आणायचं आहे.

हे ही वाचा : 

भाजपा महायुतीच्या बहुमतामुळे पवार, ठाकरे, पटोले हताश!

ट्रम्प यांचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्ज भारतासाठी ठरणार फायद्याचे!

शाहरुख खानला धमकावल्या प्रकरणी फैजान खानला अटक

नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड

दरम्यान, अतुल भातखळकर यांनी पियुष गोयल यांच्यासमोर कांदिवली पूर्वेच्या विकासात खंड पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. अतुल भातखळकर म्हणाले, मी दहा वर्षांपासून कांदिवली पूर्व वासियांच्या आशीर्वादाने आमदार आहे. मी आजपर्यंत इथल्या रहिवास्यांसाठी कामं केली आहे. मी मागची दहा वर्ष ज्याप्रमाणे कामं केली त्याप्रमाणे पुन्हा एकदा निवडून आल्यावर पुढची पाच वर्ष देखील कामं करणार आहे. त्यामुळे मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एवढंच मी तुमच्यासमोर सांगेन.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा