काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करा

काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करा

विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमी स्क्रीन्स आणि शो असून देखील या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच तब्बल १४ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभत असलेल्या या चित्रपटाला करमाफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत भातखळकरांनी ही मागणी मांडली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या संबंधीचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या चित्रपटाला करमाफी देतील असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

‘आजचे प्रश्न हे गोपनीय कायद्याचे उल्लंघन मीच केल्यासारखे होते’

काय म्हणाले भातखळकर?
जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणाऱ्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाला महाराष्ट्रात करमाफी द्यावी अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. जम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंवर मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांचे योग्य आणि खरे चित्रीकरण हे प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून समचर येत आहे. मला विश्वास आहे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या चित्रपटाला करमाफी देऊन हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा याच्या करता प्रोत्साहन देतील हा विश्वास प्रकट करतो.

दरम्यान हरियाणा सरकारने काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही भातखळकर यांच्या मागणीनुसार हा चित्रपट करमुक्त होणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version