30 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषरेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!

रेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Google News Follow

Related

कानपूरनंतर आता उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये ट्रेन उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. टपरी रेल्वे जंक्शनजवळ रुळावर लोखंडी गेटचा (लोखंडी फाटक) काही भाग ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर आनंद विहार कोतवाडाकडे जाणारी एक्स्प्रेस गाडी मध्यंतरी थांबवण्यात आली. गेटमन नवीन कुमार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या फाटकाच्या गेटमनने टपरी रेल्वे स्थानकाजवळील लोहमार्गावर लोखंडी फाटक पडल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. याच दरम्यान,  ट्रेन क्रमांक १४०८९ आनंद विहार कोतवारा एक्स्प्रेस टपरी रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली होती. परंतु, रेल्वे रुळावर लोखंडी गेट ठेवल्याची माहिती दिल्यानंतर रेल्वे मध्येच थांबवण्यात आली. अपघाताचा अंदाज घेत, रेल्वे चालकाने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली.

हे ही वाचा : 

चक्क ‘सामना’ म्हणतोय, देवाभाऊ अभिनंदन!

मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली! मनसेची मराठी माणसाला हाक

नरसिंह रावांच्या निष्ठा गांधी ‘फॅमिली’च्या चरणी नव्हत्या म्हणून..

डॉ. उदय निरगुडकर मराठी वाड्मय परिषद, बडोदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

दरम्यान, जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांसह रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता, लोहमार्गावर लोखंडी फाटकाचा तुकडा पडलेला दिसला. रेल्वे अधिकाऱ्यांनी रुळावरून लोखंडी फाटक हटवून मार्ग मोकळा केला. आनंद विहार एक्स्प्रेस सुमारे १५ मिनिटे थांबली होती. नंतर ट्रेन रवाना करण्यात आली. रेल्वे रुळावर लोखंडी फाटक सापडल्याने रेल्वे उलटण्याचा कट मानला जात आहे.

सीओ जीआरपी शुभेता आशुतोष ओझा यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. लवकरच गुन्हेगार पकडले जातील. दुसरीकडे, रेल्वेनेही अधिक सतर्क राहण्याची तयारी केली आहे. ट्रॅकवर गस्त वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा