पाकिस्तानात मुलींच्या शाळांवर हल्ले!

सोफिया नूर शाळेत केला बॉम्बस्फोट

पाकिस्तानात मुलींच्या शाळांवर हल्ले!

खैबर पख्तुनख्वामधील मुलींच्या शिक्षणाला आणखी एक मोठा धक्का बसला असून दहशतवाद्यांनी दक्षिण वझिरीस्तानच्या वाना तहसीलमधील मुलींच्या शाळेला लक्ष्य केले आहे. २०२१ च्या मध्यापासून देशाचा उत्तर-पश्चिम प्रदेश दहशतवादी हल्ल्यांनी त्रस्त आहे. जिल्ह्यांतील मुलींच्या अनेक शाळांना लक्ष्य करण्यात आले आहे. मुलींना शिक्षण देण्यासाठी वाना वेल्फेअर असोसिएशनच्या पाठिंब्याने स्थापन करण्यात आलेली सोफिया नूर शाळा, स्थापनेच्या काही आठवड्यांनंतरच बॉम्बस्फोटाला बळी पडली.

दुर्गम आणि अविकसित जिल्ह्यातील मुलींना शिक्षण देण्यासाठी वाना वेल्फेअर असोसिएशनच्या पाठिंब्याने स्थापन करण्यात आलेली सोफिया नूर शाळा ही स्थापनेच्या काही आठवड्यांनंतरच बॉम्बस्फोटाला बळी पडली. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार दक्षिणेकडील जिल्ह्यांतील आणखी एका शाळेच्या नाशाच्या अवघ्या आठ दिवस आधी हा हल्ला झाला आहे.
९ मे रोजी उत्तर वझिरीस्तानमधील शेवा शहरातील इस्लामिया मुलींच्या शाळेतही बॉम्बस्फोट झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाळेतील बॉम्बस्फोटामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून शैक्षणिक संस्थांवर वारंवार हल्ले होत आहेत.

हेही वाचा..

बुटांच्या व्यापाऱ्यांच्या घरात सापडले ४० कोटी!

पंतप्रधान मोदींच्या रॅलीत पोहोचले सिंगापूरचे उच्चायुक्त, रॅलीचे फोटो टाकत केले कौतुक!

दादरमधील मॅकडोनाल्डला बॉम्बस्फोटाची धमकी!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!

सोफिया नूर शाळेच्या काही भागात बांधकाम सुरू असताना पहाटे ३ च्या सुमारास स्फोट झाला. यामध्ये इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सोशल मीडियावर असे दावे करण्यात आले आहेत की, शाळेच्या प्रशासनाला खंडणीची पत्रे मिळाली आहेत. मात्र, स्थानिकांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.

Exit mobile version