वादग्रस्त विधाने करणाऱ्या निखिल वागळे यांची गाडी पुण्यात शुक्रवारी फोडण्यात आली. निर्भय बनो या तथाकथित सेक्युलर पक्षांच्या, संघटनाच्या आंदोलनाच्या सभेला जात असताना त्यांची गाडी फोडण्यात आली. यावेळी गाडीवर शाईफेकही करण्यात आली.
निर्भय बनोच्या सभेला भाजपने विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सभास्थळी भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. सभास्थळी ते बसले होते पण पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना तसे न करण्याबद्दल सांगितले.
हे ही वाचा:
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न मिळायला हवा!
निखिल वागळेंविरोधात गुन्हा दाखल
उत्तराखंडनंतर बरेलीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, जमावाकडून दगडफेक!
अभिषेक घोसाळकरांची हत्या ही उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरचे परिणाम!
या आधी सिन्नर येथेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथेही वागळे, वकील असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांची भाषणे झाली होती.
लालकृष्ण अडवाणी याना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याबद्दल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या वागळे यांच्या विरोधात भाजपा नेते सुनील देवधर यांनी तक्रार दाखल केली. आता गुन्हाही दाखल झाला आहे. त्यात मोदी आणि अडवाणी याना दंगलखोर म्हणत वागळे यांनी आपली पातळी दाखवली.
पुण्यात या कार्यक्रमासाठी गाडी पोहोचल्यावर तिथे त्याच्या गाडीच्या मागील आणि पुढील काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर ते कसेबसे कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि त्यांनी भाजपा विरोधात भाषण केले. या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे रोहित पवार हेदेखील उपस्थित होते.