25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’

‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचे वादग्रस्त विधान

Google News Follow

Related

काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी रविवारी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर नुकताच झालेला दहशतवादी हल्ला हा भाजपचा निवडणूकपूर्व स्टंट असल्याचा आरोप केल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे. सुरक्षा दलाकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

हे दहशतवादी हल्ले नसल्याचा दावा करून, चन्नी यांनी याचे वर्णन ‘स्टंटबाजी’ असे केले आणि भाजपने निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी अशा घटना घडवून आणल्याचा आरोप केला. असे हल्ले पूर्वनियोजित असून भाजपच्या निवडणुकीत फायदा मिळावा, यासाठी ते अंमलात आणले जातात, असेही ते म्हणाले.पंजाबमधील जालंधर येथे पत्रकारांशी बोलताना चन्नी म्हणाले, ‘ही स्टंटबाजी आहे. निवडणुका आल्या की भाजपला जिंकण्यासाठी अशी स्टंटबाजी करावी लागते. हे पूर्वनियोजित हल्ले आहेत, त्यात तथ्य नाही…”

गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये असेच हल्ले झाले, याची चन्नी यांनी आठवण करून दिली. सन २०१९मधील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, असा आरोप त्यांनी केला. भाजपला लोकांना कसे मारायचे आणि नंतर या हत्यांवर राजकारण कसे करायचे, हे पुरेपूर माहीत आहे, अशीही टीका त्यांनी केली.
भाजपला पंजाबला चिरडण्यासाठी शेतकऱ्यांना चिरडायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.अर्थात चन्नी यांनी हे वक्तव्य केले असले तरी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्या विधानाच्या अगदी विरुद्ध मत प्रदर्शन केले आहे.

हे ही वाचा:

लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!

झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

‘मला काँग्रेसच्या कार्यालयातील खोलीत बंद केले’

पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्करचा हात

रविवारी, खरगे यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि हल्ल्यात जीव गमावलेल्या हवाई दलाच्या जवानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.खरगे यांनी लिहिले की, जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने खूप दुःख झाले आहे. आम्ही या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो आणि दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहण्यासाठी देशासोबत आहोत,’
या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत राहुल गांधी यांनीही ट्वीट केले होते.

‘जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये आपल्या लष्कराच्या ताफ्यावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत लज्जास्पद आणि दुःखद आहे. शहीद झालेल्या सैनिकाला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की हल्ल्यात जखमी झालेले सैनिक लवकरात लवकर बरे होतील,’ असे ट्वीट गांधी यांनी केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा