31 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषमीरारोडच्या नयानगरमध्ये भगवा लावलेल्या गाड्या फोडल्या! महिला, मुले जखमी

मीरारोडच्या नयानगरमध्ये भगवा लावलेल्या गाड्या फोडल्या! महिला, मुले जखमी

१३ जणांना केली अटक

Google News Follow

Related

पालघर जिल्ह्यातील मीरारोड नयानगर या मुस्लिम बहुल वस्तीतील ५० ते ६० जणांच्या जमावाने भगवे झेंडे लावलेल्या मोटारीवर आणि मोटारीत बसलेल्या महिला पुरुष आणि लहान मुलांवर हल्ले दगड,लाठ्याकाठ्या, रॉड आणि वजनमापाने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात १५ ते २० जण जखमी झाले असून त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर नया नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन येथील परिस्थिती नियंत्रणात आणली.

जखमींना उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून नयानगर पोलिसांनी या प्रकरणी ५० ते ६० जणांविरुद्ध दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणे, दंगल घडवणे,हत्येचा प्रयत्न या प्रकरणी गुन्हा दाखल करून २२ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नया नगर आणि मीरा रोड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान येथील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सोमवारी (आज )अयोध्येत होणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण असताना रविवारी रात्री एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी या उत्सवाला गालबोट लावण्याच्या प्रयत्न केला आहे. रविवारी रात्री मीरा रोड, भाईदंर या परिसरातील नागरिक आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना भगवे ध्वज लावून श्री रामाचा जयघोष करीत शहरातून फिरत होते. वाहतूक कोंडीमुळे भगवे ध्वज लावलेली वाहने एका ठिकाणी गोळा झाली होती, या वाहतूक कोंडीतून निघण्या साठी अनेकांनी नयानगर येथील मार्ग निवडला होता.

नया नगर येथून ही वाहने जयघोष करित जात असताना नया नगर लोधा रोड या ठिकाणी रात्री साडे दहा वाजता एक इसम भगवे ध्वज असलेल्या वाहना समोर आला व त्याने मोटारी अडवल्या,त्याच्या पाठोपाठ हातात लाठ्याकाठ्या, रॉड, वजन मापे आणि बॅटरी हातात घेऊन ५० ते ६० जणांचा जमाव रस्त्यावर येऊन त्यांनी भगवे ध्वज तोडून वाहनावर हल्ले करण्यास सुरुवात केली, तसेच वाहनात बसलेल्या अनेकांवर या जमावाने हल्ला करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!

राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला

या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. जखमीमध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मध्यरात्री नया नगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमा अंतर्गत गुन्हा करण्यात आलेला आला असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून शांततेचे आवाहन…..

रविवारी झालेल्या वादाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर दिसून येऊ लागले आहेत.रविवारी मध्यरात्री अनेक तरुण भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालया बाहेर जमा झाले होते.त्यामुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान रविवारी किरकोळ आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वातावरण शांत ठेवावे, असे आवाहन नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा