सोमवारी सकाळी जम्मूमधील सर्वात मोठा लष्करी तळ – सुंजवान लष्करी छावणीजवळ दहशतवाद्यांनी काही अंतरावरुन गोळीबार केल्याने एक लष्करी जवान जखमी झाल्याची घटना घडली. याबद्दलची माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल सुनील बारतवाल यांनी दिली. हा लष्कराचा तळ सील करण्यात आला असून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये JeM दहशतवाद्यांनी जम्मूमधील सुंजवान लष्करी छावणीवर हल्ला केला होता. यामध्ये सहा सैनिक, एक नागरिक आणि तीन दहशतवादी ठार झाले होते. या हल्ल्यात सैनिक आणि नागरिकांसह सुमारे २० जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा..
मैतई-कुकी गटात पुन्हा गोळीबार, महिलेचा मृत्यू !
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीकडून अटक
‘IC814- द कंदहार हायजॅक’ वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपविली?
पश्चिम बंगालमध्ये बलात्काराची पुन्हा घटना, संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड !
जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या गोळीबारात सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्याच्या काही दिवसांनंतर लष्कराच्या बेस कॅम्पजवळ हा हल्ला झाला आहे. मच्छलमध्ये दोन दहशतवादी मारले गेले, तर तंगधार सेक्टरमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे.
दरम्यान, शेजारच्या जम्मूमध्ये लाठी परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सैन्याने शोध मोहीम सुरू केल्यानंतर राजौरी जिल्ह्यात आणखी एक चकमक झाली. रात्री ९.३० वाजता खेरी मोहरा लाठी व दंताळ परिसरातील सर्वसाधारण परिसरात ही कारवाई करण्यात आली.
घुसखोरीचे प्रयत्न अशा वेळी घडले जेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरले गेले आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. निकाल ४ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाईल.
या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक चकमकी झाल्या आहेत. ज्यामुळे देशाच्या प्रशासकीय आणि संरक्षण दलाला या प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यास प्रवृत्त केले गेले. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये किमान पाच जवान आणि सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर जम्मूमध्ये वेगवेगळ्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये १४ सुरक्षा कर्मचारी आणि ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.