महाराष्ट्रामध्ये बारावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सीबीएसी परीक्षा रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र मंडळाची बारावीची परीक्षाही आता रद्द करण्यात आली आहे.
राज्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करायच्या आहेत. आता बारावीचे पास होण्याचे निकष कसे असतील हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
हे ही वाचा:
बॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे
अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरणाला परवानगी द्या
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीला हिरोपंती पडली महागात
शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही
यापूर्वी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सहमती झाली. राज्य शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती निवारण विभागाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाकडे बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल, असे सांगितले होते. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र आणि राज्यांसाठी एकसमान राष्ट्रीय मागणी केली होती. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्वागत केले होते.
याआधी राज्य सरकारने १०वीची परीक्षा रद्द केली आहे. त्यावेळी १२वीची परीक्षा होणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा घेणे शक्य नसल्याची चर्चा होती. केंद्र सरकारने १२वीची सीबीएसईची परीक्षा रद्द करणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील परीक्षाही रद्दच होईल, हे स्पष्ट झाले होते. शेवटी त्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले.
अधिक बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अनलॉक पाच टप्प्यांमध्ये केले जाईल. सिनेमा हॉल, जिम, कार्यालये इत्यादी पहिल्या टप्प्यात उघडल्या जातील.