निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री आतीशी यांच्या पदरात १८ लाख जमा!

क्राउडफंडिंग मोहिमेला आतापर्यंत ४२२ देणगीदारांनी दिल्या देणग्या

निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री आतीशी यांच्या पदरात १८ लाख जमा!

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सुरु केलेल्या क्राउडफंडिंग मोहिमेच्या माध्यमातून २४ तासांच्या आत १८. ५६ लाख रुपये जमा केले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगत पैसे देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या क्राउडफंडिंग मोहिमेला ४२२ देणगीदारांनी पाठिंबा दिला आणि देणगी स्वरुपात १८. ५६ लाख रुपये जमा झाले. दरम्यान, मुख्यमंत्री आतीशी आज (१३ जानेवारी) आपला उमेदवारी आज दाखल करणार आहेत.

रविवार, १२ जानेवारी रोजी, कालकाजी मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मला ४० लाख रुपयांची गरज असल्याचे म्हटले. त्यानुसार १०० रुपये, १००० रुपये अथवा त्यापेक्षाही अधिक मदत करण्याचे आवाहन दिल्लीच्या जनतेला केले.  पक्षाच्या कामाला आणि प्रामाणिकपणाच्या राजकारणाला लोक पाठिंबा देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या मोहिमेला ४२२ देणगीदारांकडून पाठिंबा मिळाला.

मुख्यमंत्री आतीशी यांनी याचे श्रेय पक्षाने केलेल्या कामावर मतदारांच्या विश्वासाला दिले. “हे मोठे यश आम आदमी पक्षाच्या स्वच्छ, प्रामाणिक आणि परिवर्तनवादी राजकारणावरील लोकांच्या अढळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी ट्वीटरवर म्हटले.

हे ही वाचा :

आसाम-त्रिपुरामध्ये ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक, दलालही ताब्यात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर

पुडुचेरीत एका मुलाची एचएमपीव्ही चाचणी पॉझिटिव्ह

बीएसएफने बांगलादेशींचा बंगालमधील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री आतीशी कालकाजी मतदारसंघातून उभ्या आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे माजी खासदार रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा उभ्या आहेत.

Exit mobile version