दिल्लीमध्ये सध्या भीषण उष्मा असल्याने पाण्याची मागणीही अन्य दिवसांच्या तुलनेत वाढली आहे. मात्र दिल्ली पाण्यासाठी तहानलेली आहे. टँकरच्या पाण्यासाठी दिल्लीकरांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. दिल्ली सरकारच्या जलमंत्री आतिशी यांनी अनेकदा उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या दरम्यान उत्तर पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार योगेंद्र चंदालिया यांनी दिल्ली सरकारला लक्ष्य केले आहे. ‘आतिशी यांचे काम केवळ खोटे बोलणे हेच आहे आणि जल मंडळाचा संपूर्ण पैसा शक्तिशाली लोकांपर्यंत पोहोचत आहे,’ असा आरोप चंदोलिया यांनी केला.
दिल्ली सरकारला लक्ष्य
‘८९० क्युसेक पाणी सोडण्याचा करार हरियाणा सरकार आणि दिल्ली सरकारच्या दरम्यान आहे. १०४९ क्युसेक पाणी हरियाणाकडून सातत्याने दिल्लीला दिले जात आहे. टँकरमाफिया येथून पाणी भरत होते. वीरेंद्र सचदेवा आणि मी याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिस आता येथे बसतात. १०४९ क्युसेक पाण्याचा वापर दिल्लीच्या नागरिकांसाठी होणे अपेक्षित होते. दिल्ली सरकारची पाच पाणीप्रक्रिया केंद्रे आहेत.
हे ही वाचा..
‘डीपफेक’ तंत्रज्ञानाला आळा घालण्यासाठी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार!
‘दिल्लीच्या जलसंकटावर आतिशी खोटे बोलत आहेत’
दहशतवादविरोधी कारवाया तीव्र होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक
पंतप्रधान मोदींनी ‘ग्लोबल साऊथ’चे नेते म्हणून भारताची प्रतिमा केली मजबूत
वझिराबादच्या पाणीप्रक्रिया केंद्रात २५० एमजीडी पाणी स्वच्छ करून ते साठवण्याची क्षमता आहे. सन २०१३मध्ये दिल्ली सरकारने निविदा काढली की त्यातील गाळ काढावा,’ असे चंदोलिया यांनी सांगितले. आज ११ वर्षे होत आली आहेत. उच्च न्यायालयाने सांगूनही हे काम सुरू झालेले नाही. ९४ टक्के गाळ तिथेच आहे. केवळ १५ टक्के गाळ तिथे येतो. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला ते निविदा देऊ पाहात होते, ते त्यांनी दिले नाही. दुसऱ्या पक्षाला दिले. ते न्यायालयात गेले.
न्यायालयाने हा आदेश रद्द केला परंतु तरीही काम सुरू होऊ शकले नाही. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीकर तहानेने व्याकूळ आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी केवळ खोटे बोलण्याचे काम करत आहेत. सन २०१३पर्यंत दिल्लीचे जल मंडळ फायद्यात होते. आज ८२ हजार कोटींचे नुकसान मंडळ सोसत आहे. संपूर्ण पैसा टँकरमाफियांच्या माध्यमातून शक्तिशाली लोकांपर्यंत पोहोचला आहे. आतिशी यांनी हरियाणाला बदनाम करू नये,’ अशी टीका चंदोलिया यांनी केली.