पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये केवळ १०० ग्रॅममुळे बाद ठरलेली भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑलिम्पिकमध्ये बाद झाल्यामुळे विनेश फोगटबाबत कटाचा संशय निर्माण झाला होता. मात्र, अनेक खेळाडूंनी यावर भाष्य करून, खेळाच्या नियामांपुढे कोणाचे काहीच चालू नसल्याचे म्हटले होते. आता यावरून भारताची माजी मुष्टियोद्धा एमसी मेरी कोम यांनी देखील वक्तव्य केले आहे. वजन कमी करण्यासाठी खेळाडू इतर कोणाला दोष देऊ शकत नाहीत, असे मेरी कोम यांनी यांनी म्हटले आहे.
वजनामुळे बाद ठरलेल्या विनेशवर बोलताना मेरी कोम म्हणाल्या, मला खूप निराश वाटले कारण मी गेल्या अनेक वर्षांपासून तेच (वजन व्यवस्थापन) केले आहे. वजन महत्त्वाचे आहे, ही माझी जबाबदारी आहे. मी कोणाला दोष देऊ शकत नाही, असे मेरी कोमने पीटीआयने म्हटले.
हे ही वाचा :
पित्याच्या नात्याला काळीमा; पोटच्या मुलीवर अत्याचार!
कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद
अमितभाई कल किसने देखा? आताच निर्णय घ्या…
अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!
पुढे बोलताना, कोमने असेही नमूद केले की तिच्या खेळाच्या दिवसांमध्ये तिने नेहमीच तिचे वजन स्वतःवर सांभाळण्याची जबाबदारी घेतली. मला हे तिच्या (विनेशच्या) बाबतीत म्हणायचे नाही. मी हे फक्त माझ्या बाबतीत सांगत आहे. जर मी वजन नीट कमी केले नाही तर खेळणार कशी?, असे मेरी कोम यांनी म्हटले.
दरम्यान, विनेश फोगटवर भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तने टीका केली होती. कोणत्याही खेळात नियम असतात आणि नियमांमध्ये बसत नसल्यास खेळाडूला साहजिकच बाद ठरवले जाते, विनेश देखील तशीच बाद झाली. मात्र, विनेशने अपात्रतेसाठी स्वतः ऐवजी इतरांना जबाबदार धरले, असे कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटले होते.