भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक खेळाडू, दिग्गज आणि राजकारणी यांच्यावर बायोपिक बनवण्यात आले आहेत. आता देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर बायोपिक बनवणार आहे. ‘मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिए… माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे हे स्वप्न मोठ्या पडद्यावर साकारण्याची जबाबदारी हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली आहे.
दिग्दर्शक रवी जाधव लवकरच उत्थान एनपी यांच्या ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित चित्रपट आणणार आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी ‘मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिये – अटल’ या बायोपिकमध्ये भारताच्या माजी पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या या बायोपिकची घोषणा यावर्षी २८ जून रोजी झाली. पण, त्यावेळी चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. निर्मात्यांनी केवळ पंकज त्रिपाठीच्या उपस्थितीचीच घोषणा केली नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेशी संबंधित माहिती देखील शेअर केली आहे. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा :
कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय
मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा
भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती
दिग्दर्शक म्हणून मी अटलजींच्या कथेपेक्षा चांगली कथा दिग्दर्शनासाठी मागू शकत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अटलजींची कथा पडद्यावर आणण्यासाठी माझ्यासोबत पंकज त्रिपाठी यांच्यासारखे आहेत. मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेन असा विश्वास दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला आहे.