एकाच वेळी एकाच हाताने ‘तिने’ काढली १५ महापुरुषांची चित्रं, आनंद महिंद्रांनी केले कौतुक

या मुलीची कला पाहून आनंद महिंद्रही थक्क झाले आहेत.

एकाच वेळी एकाच हाताने ‘तिने’ काढली १५ महापुरुषांची चित्रं, आनंद महिंद्रांनी केले कौतुक

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर नेहमी काहीतरी वेगळे शेअर करत असतात. याच माध्यमातून ते अनेक हटके संकल्पना राबवणाऱ्यांसाठी मदतीचा हातही पुढे करतात. असंच त्यांनी एका कलाकार मुलीचा चित्र रेखाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या मुलीची कला पाहून त्यांनी तिला थेट शिष्यवृत्ती देऊ केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तरुणी एकाच वेळी एकाच हाताने १५ महापुरुषांची चित्रं रेखाटत आहे. या व्हिडिओला एका व्यक्तीने व्हॉइस ओव्हर दिला आहे. व्हिडीओमधील कलाकार तरुणीने विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे असा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ही तरुणी माझ्याकडे आली आणि म्हणाली सर मला विश्वविक्रम करायचा आहे. मला वाटलं गावातील मुलगी आहे ही काय विश्वविक्रम करणार. मी तिला कोणता विक्रम करणार असं विचारलं असता तिने दिलेलं उत्तर ऐकून मी थक्क झालो. एका हाताने एकाच वेळी मी १५ थोर व्यक्तींचे चित्रं काढणार आहे असं या तरुणीने म्हटले. हे आव्हान जगात कोणालाच जमलं नाही त्यामुळे ही मुलगी कसं करणार हे असं वाटत असतानाच या मुलीने हे अशक्य काम करुन दाखवले, असे व्हिडीओतील व्हॉइस ओव्हरमध्ये म्हटले आहे.

त्या व्हिडिओमध्ये लाकडी पट्ट्यांना वेगवेगळ्या रंगाचे पेन त्या मुलीने बांधले. पुढे ती पट्टी उचलून तिने एकाच वेळी १५ महापुरुषांची चित्रं रेखाटायला सुरुवात केली. हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्डमध्ये आहे. त्यामुळे ती अवघ्या काही सेकंदांमध्ये एकाच वेळी १५ महापुरुषांचं चित्रं पूर्ण करताना दिसते. तिने काढलेल्या चित्रांमध्ये लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, डॉ. आंबेडकर, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, झाशीची राणी, महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, स्वामी विवेकानंद यासारख्या १५ महापुरुषांची चित्रं आहेत.

हे ही वाचा:

एलॉन मस्क वॉश बेसिन घेऊन पोहचले ट्विटर कार्यालयात

कॅनडामध्ये भारतीयांना मारहाण करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना भारतीयांकडून चोख उत्तर

महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयची दिवाळीभेट, आता पुरुषांएवढेच मानधन

चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

या मुलीची कला पाहून आनंद महिंद्रही थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करताना आनंद महिंद्रांनी, १५ पोट्रेट काढणं हे कलेपेक्षाही फार मोठं कौशल्य आहे. हा चमत्कारच आहे, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी या मुलीची माहिती देण्याची विनंती केली आहे. त्या मुलीला शिष्यवृत्ती आणि इतर पद्धतीची आवश्यक ती सर्व मदत देण्यास इच्छूक असल्याचे आनंद महिंद्रांनी म्हटले आहे.

Exit mobile version