ओडिशाच्या भुवनेश्वरमधील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी दोन चोरट्यांनी चाकूच्या धाकाने दागिने लुटले आणि त्यानंतर २७ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. भुवनेश्वरच्या मैत्री विहारमध्ये ३० सप्टेंबर रोजी पहाटे २ च्या सुमारास हा गुन्हा घडला.
पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी आधी तिचे दागिने आणि मोबाईल चाकूचा धाक दाखवून लुटून नेले आणि नंतर मदतीसाठी आरडाओरड केल्यास तिच्या २ वर्षाच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
हेही वाचा..
अनेक दशके सत्ता राबवूनही काँग्रेसने महिलांची कुचंबणा केली!
इस्रायलच्या हल्ल्यांनंतर बैरुतचे नागरिक घरे सोडून ‘कारमध्ये’
भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला
‘स्वच्छ भारत मिशन’च्या दशकपूर्तीला मोदींनी लोकसहभागाची घेतली दखल!
पोलिसांनी सांगितले की, ही महिला भुवनेश्वरमधील एका खाजगी रुग्णालयात काम करते. ती १० दिवसांपूर्वीच फ्लॅटमध्ये राहायला गेली होती. घरापर्यंत पोहोचण्यासाठी बांबूचे खांब वापरून चोरट्यांनी इमारतीत प्रवेश केला असावा, असाही संशय त्यांना आहे. या गुन्ह्यासंदर्भात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी बलात्कार व लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कमतरतेमुळे तपास करणे कठीण झाले असून पोलीस जवळपासच्या भागातील फुटेज तपासत आहेत.
आणखी एका प्रकरणात ओडिशाच्या संबलपूर येथील पॉक्सो न्यायालयाने २०२२ मध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने पीडितेला मरेपर्यंत फाशी देण्याचे आदेश दिले आणि १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
या नराधमाने मुलीला शेतातून पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला होता. नंतर, त्याने मुलीचा शिरच्छेद केला होता. नुकत्याच राज्य विधानसभेत मांडलेल्या श्वेतपत्रिकेनुसार २०२२ च्या आकडेवारीच्या तुलनेत २०२३ मध्ये ओडिशात बलात्काराच्या घटनांमध्ये किरकोळ घट झाली. २०२३ मध्ये राज्यात २,८२६ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली, तर २०२२ मध्ये ३,१८४ बलात्कारांची नोंद झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने ओडिशामधील आयपी ॲड्रेसवरून बाल लैंगिक शोषण सामग्री अपलोड केल्याच्या ८२,१३२ तक्रारी राज्य सरकारकडे नोंदवल्या.