इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावर १७ भारतीय!

सुटकेसाठी भारताची इराणशी द्विपक्षीय स्तरावर बोलणी सुरू

इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावर १७ भारतीय!

इराण आणि इस्रायल यांच्यातील संभाव्य संघर्षाची धग भारताला बसली आहे. इस्रायली नागरिकाच्या मालकीचे जहाज इराणने होर्मुझच्या आखातात ताब्यात घेतले असून त्यावर १७ भारतीय कर्मचारी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताने इराणशी द्विपक्षीय स्तरावर बोलणी सुरू केली आहेत.

इस्रायलने काही दिवसांपूर्वी सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यात इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी इस्रायलने मात्र या हल्ल्यातील आपला सहभाग नाकारला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला असताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने एमएससी एरीज हे होर्मुझमधून जाणारे जहाज शनिवारी ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

रोड शो दरम्यान दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जखमी!

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळीबार!

इराणकडून ड्रोन हल्ला; इस्रायल देणार प्रत्युत्तर

रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक

इराणचे कमांडो हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या जहाजावर छापा टाकत असल्याचा व्हिडीओ असोसिएटेड प्रेसने जाहीर केला आहे. हे जहाज इस्रायलशी संबंधित असल्याचा दावा करून हे कमांडो या जहाजावर उतरले आणि त्यांनी हे जहाज इराणच्या दिशेने नेले. हे जहाज करणाऱ्या कंपनीने हे जहाज इराणने जप्त केल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. या जहाजाची व त्यावरील २५ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी आम्ही संबंधित प्रशासनाशी चर्चा करत आहोत, असे या जहाज कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version