अंतराळवीर हे अंतराळात एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असतात. डॉक्टर, दुरुस्ती करणारा, जीवशास्त्रज्ञ अशा अनेक भूमिका अंतराळवीराला गरजेनुसार पार पाडाव्या लागतात. आता या भूमिकांमध्ये शेतकऱ्याची भूमिकाही समाविष्ट झाली आहे.
अंतराळात काही दिवसांपूर्वी अंतराळवीरांनी अंतराळात मिरचीचे यशस्वी उत्पादन केले होते. आता याच प्रयोगाच्या पुढच्या टप्प्यात मिरचीचे पुन्हा यशस्वी उत्पादन केले आहे. पृथ्वीपासून दूर अंतरावर एका अंतराळ स्थानकात हा प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे. उड्डाण अभियंता मार्क वांदे हे यांनी परिभ्रमण प्रयोगशाळेच्या अत्याधुनिक वनस्पती अधिवासातून चार झाडांच्या २६ मिरच्यांचे नमुने गोळा केल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध ‘बंड’
ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह
वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?
शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल
गेल्या महिन्यात अंतराळात स्थानकात टॅको पार्टी साजरी करण्यात आल्याचे फोटो नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर यांनी शेअर केले होते. ट्विटरवर त्यांनी फोटो शेअर करताना लिहिले होते की, पीक कापणीनंतर आम्हाला लाल आणि हिरव्या मिरच्यांचा आस्वाद घेता आला. आम्ही सर्वोत्तम स्पेस टॅको (मेक्सिकन खाद्यपदार्थ) बनवले आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने चार महिन्यात अंतराळात मिरचीचे रोप तयार करून मिरची पिकवली होती. न्यू मेक्सिकोच्या हॅच व्हॅलीमध्ये शोध लागलेल्या एस्पॅनोला जातीच्या मिरचीपासून हे मिरचीचे पीक घेण्यात आले होते. अंतराळात मिरची पिकवणे हे इतर पिकांच्या तुलनेत अवघड असल्याचे नासाने म्हटले आहे.