औषधनिर्मितीमधील दिग्गज कंपनी ऍस्ट्रान्झेकाने जागतिक बाजारपेठेतून कोविड-१९ लस मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच जगभरातून या लशी मागे घेतल्या जातील. मात्र कंपनीने यामागे व्यावसायिक कारणे असल्याचा दावा केला आहे.ऍस्ट्राझेनेका कंपनीने करोना १९ची लशीमुळे अतिशय दुर्मिळ असा टीटीएस आजार होऊ शकतो, अशी कबुली नुकतीच न्यायालयासमोर दिली होती. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
मात्र न्यायालयीन सुनावणी हा निव्वळ योगायोग असून व्यावसायिक कारणास्तव ही लस बाजारातून मागे घेतली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यापुढे ही लस तयार केली जाणार नाही किंवा पुरवली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केल्याचे वृत्त ‘टेलिग्राफ’ने दिले.या लशीमुळे दुर्मिळातील दुर्मिळ असा टीटीएस- थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम आजार होऊ शकतो, अशी कबुली न्यायालयात दिली असली तरी हा निव्वळ योगायोग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने स्वेच्छेने ‘मार्केटिंग अधिकृतता’ मागे घेतल्याने ही लस यापुढे युरोपियन युनियनमध्ये वापरण्यासाठी अधिकृत ठरणार नाही.
हे ही वाचा:
हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!
मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!
नीरव मोदी याला ब्रिटनच्या न्यायालयाचा धक्का!
खलिस्तान समर्थक परेडमध्ये ‘हिंसेचा उत्सव’;भारताने कॅनडाला सुनावले!
माघारीचे अर्ज ५ मार्च रोजी सादर करण्यात आले आणि ते मंगळवारी लागू झाले.अशाच प्रकारचे अर्ज ब्रिटन आणि इतर देशांमध्ये सादर केले जातील. या देशांनी कंपनीच्या व्हॅक्सझेव्हरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लसीला मान्यता दिली होती.रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होण्यास कारणीभूत असणाऱ्या दुर्मिळ दुष्परिणामामुळे वॅक्सझेव्हरिया या लशीचा जागतिक स्तरावर तपास सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या न्यायालयीन सुनावणीत या लशीमुळे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, टीटीएस होऊ शकतो, अशी कबुली ॲस्ट्राझेनेका कंपनीने दिली होती.
टीटीएसमुळे ब्रिटनमध्ये किमान ८१ मृत्यू झाले तर, अनेकांना गंभीर आजार झाले. त्यामुळे कंपनीवर ५०हून अधिक कथित पीडित आणि शोकग्रस्त नातेवाईकांनी खटला दाखल केला असून त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
‘जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी वॅक्सझेव्हरियाने बजावलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. स्वतंत्र अंदाजानुसार, केवळ वापराच्या पहिल्या वर्षात ६५ लाखांहून अधिक जीव वाचवले गेले आणि जागतिक स्तरावर तीन अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले. आमच्या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली आहे आणि जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यापकपणे ओळखला जातो,’ असे ॲस्ट्राझेनेका कंपनीने नमूद केले आहे.