असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सच्या ‘ॲपकॉन २०२५’ परिषदेचे मुंबईत आयोजन

जगभरातील डॉक्टर्स, वैद्य सहभागी होणार

असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सच्या ‘ॲपकॉन २०२५’ परिषदेचे मुंबईत आयोजन

असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स यांच्या वतीने ‘ॲपकॉन २०२५’ चे या पाचव्या आंतरराष्ट्रीय आणि १४ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन यंदा मुंबईत करण्यात आले आहे. ५, ६, आणि ७ एप्रिल रोजी ही परिषद होणार असून परिषदेत जगभरातील डॉक्टर्स, वैद्य सहभागी होणार आहेत. ‘औषधं जगतः सेतु’ अशी यंदाची थीम आहे.

२०१८ मध्ये रौप्य महोत्सवी कार्यक्रम साजरा केल्यानंतर २०२५ मधल्या या परिषदेची घोषणा करण्यात आली होती. सातत्याने वैद्यकीय शिक्षण हा आवश्यक घटक मानला जातो. याच पार्श्वभूमीवर असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स सातत्याने कार्य करत आहे. आयुर्वेदाविषयी जनजागृती करणे, हा प्रमुख उद्देश या मागचा आहे. त्यासाठी दर दोन वर्षांनी असोसिएशनकडून ब्रँड कॉन्फरन्स ॲपकॉनचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचे हे आयोजन हॉटेल ताज लँड्स एंड, बँडस्टँड, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे करण्यात आले आहे.

हेही वाचा..

महाराष्ट्राच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत, पण मुले उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद

आप आमदार गोगींचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!

हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!

कमी नोंदणी शुल्क, थेट कार्यशाळा, विविध विशेष सत्रे, जगभरातील वक्ते, डिजिटल मार्केटिंग आणि जागतिक संधी यावर एक सत्र, व्यावसायिकांच्या औद्योगिक संबंधांवर एक सत्र, कॉर्पोरेट हॉस्पिटलमधील संधींवरील सत्र, फार्मा उद्योगावर एक सत्र अशी या परिषदेची वैशिष्ट्ये आहेत. या पूर्वीची परंपरा कायम ठेवत या परिषदेलाही सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.

Exit mobile version