28 C
Mumbai
Sunday, October 6, 2024
घरविशेषकाश्मीरमधील पाच पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त !

काश्मीरमधील पाच पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त !

बारामुल्ला न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारची कारवाई

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जात आहेत, जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या अपंग करता येईल. या मालिकेत जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पोलिसांनी पाकिस्तानमध्ये बसलेल्या पाच दहशतवाद्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बारामुल्ला न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने पाच दहशतवाद्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.

बशीर अहमद गनी, मेहराजुद्दीन लोन, गुलाम मोहम्मद, रेहमान भट्ट आणि रशीद लोन अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत, ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे सर्वजण बारामुल्लाच्या विविध भागातील रहिवासी आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर बारामुल्लामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हे ही वाचा:

रशियात भीषण अपघात; रेल्वेचे नऊ डबे रुळांवरून घसरले!

मणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे!

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ‘एम्स’मध्ये !

केजरीवालांना सीबीआय कोठडीत भगवद्गीता बाळगण्याची परवानगी

हे दहशतवादी पाकिस्तानात बसून खोऱ्यामध्ये दहशत पसरवण्याचे काम करत होते. येथील दहशतवाद्यांना देखील मदत करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खोऱ्यात दहशत पसरवण्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना तपासादरम्यान या दहशतवाद्यांच्या मालमत्तेची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तपासणी करून दहशतवाद्यांवर सीआरपीसी कलम ८३ अंतर्गत कारवाई करत त्यांच्या जमिनी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा