एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभेतला जुना व्हिडीओ शेअर

एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, आणि तेलंगणा राज्याच्या लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार तीन राज्यात भाजपने मुसंडी मारली.मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्याच्या निवणुकीत भाजप पक्ष अव्वल ठरला आहे.निकालांनंतर भाजपकडून ठीक-ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी ट्वीट करत विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. स्मृती ईराणी यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, ‘एक अकेला सब पर भारी’, असे ट्विट केले आहे.

स्मृती इराणी यांनी नरेंद्र मोदीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहे देश बघत आहे एक अकेला अनेकांना भारी पडत आहे. नरेंद्र मोदी यांचे हे भाषण लोकसभेतील आहे. हे भाषण जुने असून त्याचा व्हिडीओ आता शेअर करत विजयाचे श्रेय नरेंद्र मोदींना दिले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, देशात एकच गॅरंटी मिळते ती म्हणजे मोदी गॅरंटी आहे.

हे ही वाचा:

अमित शहा म्हणाले, ‘अवघ्या पाच मिनिटांत कारागृह व्यवस्थापन मंत्र्याचा कैदी झालो’

मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ

कंडक्टरवर चाकूहल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत गंभीर बाब उघड!

गिरगावमधील चारमजली इमारतीला आग; दोन ठार!

 

दरम्यान,निवडणुकीच्या आलेल्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशमध्ये भाजपनं बहुमताच्या आकड्यासह मोठी मुसंडी मारली आहे.कलांनुसार भाजपने १५८ जागांवर आघाडी मारली.राजस्थानात भाजप १११ जागांसह आघाडीवर आहे.तसेच छत्तीसगडमध्ये भाजप ५२ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला ३६ जागांवर आघाडी मिळाली आहे.तर भाजपला तेलंगणात केवळ नऊ जागांवर आघाडी मिळाली असून काँग्रेसने ६८ जागांवर यश मिळवलं आहे.

Exit mobile version