विधानसभा निवडणूक म्हणजे मौका…’हिंदूविरोध्यांना गाडण्याचा अन वोट जिहादला झटका देण्याचा’

भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्वीट

विधानसभा निवडणूक म्हणजे मौका…’हिंदूविरोध्यांना गाडण्याचा अन वोट जिहादला झटका देण्याचा’

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, विधानसभा निवडणूक म्हणजे मौका… हिंदूविरोध्यांना गाडण्याचा वोट जिहादला झटका देण्याचा स्थगिती, बंदीवाल्यांना औकात दाखवण्याचा देवाच्या बापाला जागा दाखवण्याचा जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांना चेपण्याचा हिंदूंची एकजूट दाखवण्याचा मग साधणार ना मौका???, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाराष्ट्राचे एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे.

 

Exit mobile version