बिहार, बंगाल, मध्यप्रदेशसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर होणार पोटनिवडणुका!

१० जुलै रोजी मतदान अन १३ जुलैला निकाल

बिहार, बंगाल, मध्यप्रदेशसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर होणार पोटनिवडणुका!

निवडणूक आयोगाने बिहार, बंगाल, मध्यप्रदेशसह ७ राज्यांतील १३ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.१३ विधानसभा जागांसाठी १० जुलै रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

१० जुलै रोजी बिहारमधील १, बंगालमधील ४, तामिळनाडूमधील १, मध्य प्रदेशातील १, उत्तराखंडमधील २, पंजाबमधील १ आणि हिमाचलमधील ३ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, या जागांसाठी १४ जून रोजी अधिसूचना जारी केली जाईल. नामांकनाची अंतिम तारीख २१ जून असेल. २४ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ जून निश्चित करण्यात आली आहे. १० जुलै रोजी मतदान होणार असून १३ जुलैला निकाल लागणार आहे.

हे ही वाचा:

पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!

मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न

दहशतवाद्यांनी २० मिनिटे गोळीबार केला आणि…. जखमी यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

रशियाच्या लढाऊ विमानाला युक्रेनने केले लक्ष्य!

दरम्यान, देशात नुकत्याच ७ टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि ४ जून रोजी त्याचा निकाल आला. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले.यावेळी एनडीएला २९३ जागा मिळाल्या तर इंडी आघाडीला २३४ जागा मिळाल्या.दरम्यान, बहुमताच्या जोरावर एनडीए सरकारने देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले.एनडीएचे प्रमुख नेते नरेंद्र मोदींनी ९ जूनला पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली.पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील सहा खासदारांचा समावेश आहे.

 

Exit mobile version