मालाडच्या तपोवन मंदिरातील मठाधिपतींवर प्राणघातक हल्ला !

कुरार व्हिलेज पोलिसांकडून गुन्हा दाखल

मालाडच्या तपोवन मंदिरातील मठाधिपतींवर प्राणघातक हल्ला !

मालाड येथील तपोवन मंदिरातील ६७ वर्षीय मठाधिपती श्री.महंत माधवाचार्यजी यांच्यावर अनोळखी इसमाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पहाटे घडली. या हल्ल्यात मठाधिपती गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला दूध चोरीच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी मंदिरातील माजी कर्मचाऱ्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाड पूर्व येथील पठाण वाडी परिसरात संकट मोचन विजय हनुमान टेकडी, तपोवन मंदिर आहे, या मंदिराचा परिसर मोठा असून त्यातच गोशाळा, तसेच बाहेरून येणाऱ्या साधू, तपस्वीसाठी आश्रम बांधण्यात आलेला आहे. या मंदिराचे आणि आश्रमाचे श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी, (६७) हे मठाधिपती आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार मंदिर व गौशाळेचा कारभार चालतो. गोशाळेत गौ सेवक म्हणून अनेकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यात सूर्यनारायण दास हा गौसेवक गाईचे दूध काढण्याचे काम करीत होता.

हे ही वाचा:

पूजा खेडकरने आयएएस प्रशिक्षण केंद्राचा आदेश धुडकावला; अंतिम मुदत उलटूनही गैरहजर

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली मुदतवाढ

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत असतानाचं जाणवला भूकंपाचा धक्का

ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

सूर्यनारायण हा गाईचे दूध काढून त्यातील दूध चोरी करून परस्पर बबाहेरील लोकांना विकत असल्याचा संशयावरून श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी, यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी हे हनुमान मंदिर समोर उजवीकडे असलेल्या धुणी मंदिरात हवन करीत होते त्यावेळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मठाधिपती हे मोठयाने ” बचाव बचाव” मार रहा है! इसको पकडो ” असे ओरडत असल्याचे सुरक्षा रक्षाकाने ऐकताच सुरक्षा रक्षक धुणी मंदिराकडे धावत जात असताना एक अनोळखी इसम धुणी मंदिरातून धावत जातांना सुरक्षा रक्षकाने त्याला पकडले,असता त्या इसमाने धक्काबुकी करून सुरक्षा रक्षकाच्या तावडीतून सुटका करून पळून गेला.

सुरक्षा रक्षकाने मंदिराकडे धाव घेतली असता मठाधिपती श्री. महंत माधवाचार्यजी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, सुरक्षा रक्षकानी तात्काळ इतरांची मदत घेऊन जखमी श्री. महंत माधवाचार्यजी यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.श्री. महंत माधवाचार्यजी यांनी गळ्यावरील वार चुकवताना त्यांच्या खाद्यावर आणि मानेवर तीक्ष्ण हत्यारांची जखम झाली असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे.कामावरून काढल्याच्या रागातून गौसेवक सूर्यनारायण दास याने मठाधिपती श्री.महंत माधावचार्य यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या संशयावरून कुरार व्हिलेज पोलिसांनी सूर्यनारायण दास सह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version