‘या’ राज्यात मिळणार मोफत रेमडेसिवीर

‘या’ राज्यात मिळणार मोफत रेमडेसिवीर

कोरोनाच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची देशभर प्रचंड मागणी आहे. अशातच आता भारतातील एका राज्याने आपल्या राज्यातील नागरिकांना हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारचा निर्णय घेणारे हे भारतातले पहिले राज्य ठरले आहे.

भारतात रेमडेसिवीरची मागणी खूपच वाढली आहे. पण अत्यावश्यक असणाऱ्या या इंजेक्शनची किंमत खूप जास्त आहे. या इंजेक्शनच्या किंमतीबाबत भारत सरकारने नुकताच निर्णय घेत या इंजेक्शनच्या किंमतीत घट केली आहे. तर देशातील एका राज्याने आणखीन एक पाऊल पुढे टाकत राज्यातील नागरिकांसाठी हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हे राज्य म्हणजे आसाम. आसाममधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या राज्यातील नागरिकांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन विनामुल्य उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. राज्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. शनिवार, १७ एप्रिल रोजी या संबंधीचा निर्णय आसाम सरकारने घेतला. आसाम सरकारच्या आरोग्य खात्याच्या या निर्णयानुसार राज्यातील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना रेमडेसिवीर मोफत उपलब्ध होणार आहे तर इतर रुग्णांना या इंजेक्शनची आहे ती किंमत मोजावी लागणार आहे.

हे ही वाचा:

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर

जेईई परीक्षा तूर्तास स्थगित

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी अटक होते

सद्ध्या देशात रेमडेसिवीरची मागणी खूपच वाढली आहे. त्या तुलनेत त्याचा पुरवठा मात्र कमी आहे. हा समतोल साधण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली. तर उत्पादन वाढवण्यासाठी नव्या प्लॅंट्सना मान्यताही देण्यात आली आहे.

Exit mobile version