गुवाहाटीत सापडले अल कायदाशी संबंधित दोन बांगलादेशी अतिरेकी!

आसाम पोलिसांची कारवाई

गुवाहाटीत सापडले अल कायदाशी संबंधित दोन बांगलादेशी अतिरेकी!

आसाम पोलिसांनी सोमवारी (१३ मे) मोठी कारवाई करत गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघेही बांगलादेशचे नागरिक असून ते बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले होते आणि त्यानंतर येथे तळ ठोकून होते.

अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.देशातील तरुणांना कट्टरतावादी बनवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.हे दोघे दहशतवादी अवैधरित्या राज्यात प्रवेश करून येथील तरुणांना भडकवण्याचे काम करत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले.यानंतर दोघांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

वाराणसीच्या उत्स्फूर्त जल्लोषात मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

सलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या

श्रीनगरमध्ये ऐतिहासिक ३८ टक्के मतदान!

रास्व संघाचा नेता रुद्रेशची हत्या केल्यानंतर पीएफआयकडून हिंदूंना मारण्यासाठी ‘डेथ स्क्वॉड’ची उभारणी!

पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेले दोघे आरोपी बांगलादेश मधील ब्राह्मणबारी जिल्ह्यातील आणि नेट्रोकोना जिल्ह्यातील रहिवासी आहेत.बहार मियां (३०) आणि रसेल मियां (४०) अशी दोघांची नावे आहेत.हे दोघे अंसारुल्लाह बांग्ला टीमशी (एबीटी) जोडले गेलेले आहेत, जी अल-कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.

अधिक माहिती देताना आसाम पोलिसांनी सांगितले की, हे दहशतवादी बांगलादेशी नागरिक आहेत. पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करून बेकायदेशीरपणे राहत होते. आपले नेटवर्क वाढवण्यासाठी त्याने भारतातून काही कागदपत्रेही मिळवली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन आधार कार्डही जप्त केले असून, ते बनावट असल्याचा संशय आहे.या प्रकरणी आसाम पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version