आसाम पोलिसांच्या एसटीएफने आयआयटी-गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. हा विद्यार्थी कथितपणे दहशतवादी संघटना आयएसआयएसआयमध्ये सहभागी होण्यासाठी जात होता.शनिवारी संध्याकाळी या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. आयएसआयएस भारताचा प्रमुख हारिस फारूकी आणि त्याचा साथीदार अनुराग सिंह उर्फ रेहान यांना धुबरी येथे अटक केल्यानंतर चार दिवसांनंतर या विद्यार्थ्याला पकडण्यात आले.
आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांनी ‘एक्स’वर या संदर्भातील माहिती दिली. ‘आयएसआयएसकडे कल असणाऱ्या आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे,’ असे त्यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.
विद्यार्थ्याने पाठवला होता ईमेल
अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एसटीएफ) कल्याण कुमार पाठक यांनी सांगितले की, एक ईमेल मिळाल्यानंतर त्याचे तथ्य जाणून घेऊन चौकशी सुरू केली. हा ईमेल विद्यार्थ्याने पाठवला होता. ज्यात त्याने दावा केला होता की तो आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहे. ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी आयआयटी-गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की हा विद्यार्थी दुपारपासूनच गायब असून त्याचा मोबाइल फोनही बंद आहे. हा विद्यार्थी चौथ्या वर्षाचा विद्यार्थी असून दिल्लीच्या ओखला येथे राहतो.
हे ही वाचा :
कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!
आरसीबी पराभवानंतरही विराट कोहली सोशील मीडियावर व्हायरल
नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
केजरीवालांची अटक पवारांना इतकी का झोंबतेय?
एसटीएफ कार्यालयात विद्यार्थ्याला आणले
या विद्यार्थ्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर संध्याकाळी स्थानिकांच्या मदतीने त्यांना गुवाहाटीपासून सुमारे ३० किमी दूर अंतरावर पकडण्यात आले. प्राथमिक तपासानंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आले आहे.
काळा झेंडा हस्तगत
विद्यार्थ्याच्या हॉस्टेलमधील खोलीत कथितपणे आयएसआयसारखा दिसणारा एक काळा झेंडा आढळला आहे. या दहशतवादी संघटनांशी संबंधित तपास करणाऱ्या पोलिसांना हा झेंडा तपासासाठी पाठवण्यात आला आहे. हॉस्टेलमधील त्याच्या सामानाची तपासणी केली जात आहे.