आसाम विधानसभेत दोन तासांचा नमाज पठणाचा ब्रेक रद्द !

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

आसाम विधानसभेत दोन तासांचा नमाज पठणाचा ब्रेक रद्द !

आसाम विधानसभेने शुक्रवारी (३० ऑगस्ट) अधिकृतपणे दोन तासांच्या जुम्मा ब्रेकच्या नियमात सुधारणा केली आहे. मुस्लिम आमदारांना शुक्रवारची (जुम्माची) नमाज अदा करण्यासाठी ऐतिहासिकदृष्ट्या दिलेली दोन तासांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. आसाम विधानसभेत ही प्रथा मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्लाह यांनी १९३७ साली सुरू केली होती. मात्र, आता ही प्रथा बंद करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी यांचे आभार मानले आहेत.

आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आमदार बिस्वजित फुकन यांनी सांगितले की, भारतात ब्रिटीश काळापासून आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी सुट्टी दिली जात होती. दुपारी १२ ते २ दरम्यान दोन तासांचा ब्रेक दिला जात होता. या दोन तासांच्या ब्रेकमध्ये मुस्लिम आमदार दर शुक्रवारी नमाज अदा करत असत. मात्र, आता हा नियम आता बदलण्यात आला आहे.

हे ही वाचा :

काँग्रेसवाल्यांना छत्रपतींची आठवण आली हेही नसे थोडके…

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपात सामील !

नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून माफी मागतो’

मागील नियमानुसार, मुस्लिम सदस्यांना नमाज पठणासाठी जाण्यासाठी विधानसभेची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता तहकूब करण्यात येत होती. मात्र, नवीन आणि सुधारित नियमांनुसार विधानसभेचे कामकाज धार्मिक कारणांसाठी तहकूब न करता चालवले जाणार आहे. प्रत्येक वाराप्रमाणे शुक्रवारी सुद्धा विधानसभेचे कामकाम सकाळी ९.३० वाजता चालू होणार आहे.

Exit mobile version