ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा

ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला  बोजवारा

महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी अस्मिता योजनेच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जात होते, पण आता महाराष्ट्रात असलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही योजना बंद पडली आहे. गेल्या दीड वर्षापासून आशा सेविका, आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या उपचारांत गुंतल्या असल्यामुळे या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारच्या या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गावखेड्यातील लेकीभगिनींचे आरोग्य धोक्यात आहे. सॅनिटरी नॅपकिन पुरविणाच्या अस्मिता योजनेचा ठाकरे सरकारने बोजवारा उडवला आहे. आशासेविक या करोनात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याजागी दुसरा पर्यायच न उभा केल्याने ही योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न धुळीस मिळाले आहेत.

हे ही वाचा:

मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा

काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात

मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात

पंतप्रधान भारतीय जनशुद्धी योजनेच्या माध्यमातून सुविधा पॅडचे महिलांना वाटप केले जात होते. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या माध्यमातून राबविली जात आहे.

सात वर्षांपूर्वी केंद्र सरकारने औषध मंत्रालय आणि रसायन व खत मंत्रालयाच्या माध्यमातून १२ हजार कोटींचे सॅनिटरी नॅपकिन देशभरातील तळागाळातील महिलांना पोहोचिवण्याचा आराखडा तयार केला.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा त्यात व्यग्र झाल्यामुळे या योजनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही. आता आशा सेविकाही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनीही संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सगळीकडून ठाकरे सरकारच्या कामगिरीवर टीका होत आहे.

Exit mobile version