शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!

मुंबई उच्च न्यायालयाने दंड रद्द करण्यास दिला नकार

शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!

शेजाऱ्याकडून लिंबु मागणे एका सीआयएसएफ कॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले आहे.अपरात्री शेजाऱ्याचा दरवाजा ठोठावल्याबद्दल कॉन्स्टेबलवर गैरवर्तनाचा आरोप आणि दंड ठोठावण्यात आला होता.कॉन्स्टेबलवर ठोठावण्यात आलेला दंड रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (१३ मार्च) नकार दिला आहे.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एमएम साठये यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.खंडपीठाने सांगितले की, “घरातला माणूस गैरहजर आहे आणि घरात एक महिला तिच्या सहा वर्षीय मुलीसह आहे हे माहित असून पोटदुखीच्या फालतू, शुल्लक कारणासाठी लिंबू मागण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा ठोठावणे, हे अत्यंत निंदनीय आहे, असे खंडपीठाने म्हटले.

११ मार्चच्या आदेशात असेही म्हटले आहे की, शेजारी राहणाऱ्या महिलेचा पती हा कॉन्स्टेबलचा सहकारी असून पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या निवणुकीसाठी तो ड्युटीवर होता.याची कॉन्स्टेबलला संपूर्ण जाणीव होती, त्यामुळे त्याचे हे कृत्य अशोभनीय आहे, असे न्यायालयाने सांगितले.आरोप करण्यात आलेल्या सीआयएसएफ कॉन्स्टेबलचे नाव अरविंद कुमार असे आहे.

हे ही वाचा:

दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

पश्चिम बंगाल: शाहजहान शेखच्या ठिकाणांवर ईडीचा छापा!

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

कॉन्स्टेबल अरविंद कुमार याने गैरवर्तणुक केल्याबद्दल त्याच्यावर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांना आव्हान देत कोर्टात धाव घेतली होती.१९ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कॉन्स्टेबलने त्याच्या शेजाऱ्याच्या घराचा दरवाजा ठोठावला.घरात लहान मुलीसोबत असणाऱ्या महिलेने अपरात्रीच्या वेळेस शेजाऱ्याला दारासमोर पाहिल्याने घाबरली आणि तिने त्याला इशारा देत धमकावले, त्यानंतर तो निघून गेला, असा आरोप कॉन्स्टेबलवर आहे.

त्यानंतर महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर त्याची तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर त्याची चौकशी सुरु करण्यात आली.त्याचे हे वागणे गैरवर्तन असल्याचे,चौकशीत दिसून आले आणि कॉन्स्टेबलच्या अशा वागण्यामुळे दलाची प्रतिमा खराब होते.या घटनेपूर्वी कॉन्स्टेबलने मद्य प्राशन केल्याचेही तपासात आढळून आले.

यानंतर कॉन्स्टेबलला शिक्षा म्हणून त्याचा पगार तीन वर्षांच्या कालावधीसाठी कमी करण्यात आला, त्या दरम्यान त्याला कोणतीही वाढ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.दरम्यान,कॉन्स्टेबल कुमार यांनी दावा केला होता की, त्यांना अस्वस्थ वाटत होते म्हणून लिंबू मागण्यासाठी त्यांनी शेजाऱ्याचा दरवाजा ठोठावला होता.या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय निर्णय देत, शेजाऱ्याकडून अपरात्री लिंबू मागणे हे चुकीचे असल्याचे सांगितले.तसेच कॉन्स्टेबल कुमार यांचे हे वर्तन सीआयएसएफसारख्या दलाच्या अधिकाऱ्यासाठी अशोभनीय असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

Exit mobile version