‘भारतात काय बदलले? उत्तर नरेंद्र मोदी आहेत’

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचे विधान

‘भारतात काय बदलले? उत्तर नरेंद्र मोदी आहेत’

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी गेल्या दशकात भारतात झालेल्या गहन बदलांचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. लंडनमध्ये एका दिवाळी कार्यक्रमाला संबोधित करताना, जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींनी देशाची वाटचाल घडवण्यात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्याचे सांगितले.

‘मी जग बदलले आहे, आपले नाते बदलले आहे, ब्रिटन बदलला आहे आणि भारत बदलला आहे, असे म्हणत सुरुवात केली. पण तुम्ही मला विचारू शकता की, भारतात काय बदलले आहे. तुम्हाला उत्तर माहीत आहे. उत्तर मोदी आहे,’ असे जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी गेल्या दशकात भारताच्या प्रगतीला आकार देणाऱ्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’, मुलींसाठी शौचालये बांधणे, आर्थिक समावेशनासाठी जनधन योजना, घरांसाठी आवास योजना आणि डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया यांसारख्या प्रमुख प्रकल्पांवर त्यांनी प्रकाश टाकला.

हे ही वाचा:

रस्ता अडवणाऱ्या दोघांनी हॉर्न वाजवणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्याला केली जबर मारहाण

‘मोदी म्हणजे रॉकेट, अन् उद्धव ठाकरे फुसकाबार!

अमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!

कर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या

‘ही दहा वर्षे खरोखरच सामाजिक-आर्थिक होती. भारतात क्रांती झाली. गेल्या ६५ वर्षांत देशाने जेवढी नवीन विद्यापीठे आणि महाविद्यालये निर्माण केली होती, तेवढीच नवीन विद्यापीठे आणि महाविद्यालये आम्ही प्रत्यक्षात आणली आहेत,’ असे जयशंकर म्हणाले. राजनैतिक आघाडीकडे लक्ष वळवून जयशंकर यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध नव्याने मांडण्याची गरज अधोरेखित केली. दोन्ही देशांत झालेल्या गहन परिवर्तनांची कबुली देताना त्यांनी समकालीन युगाला अनुकूल अशी भागीदारी तयार करण्याचे महत्त्व व्यक्त केले.

‘आम्ही आज भारत आणि ब्रिटनमधील संबंध नव्याने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही तसे करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण, गेल्या अनेक काळात अनेक दशकांनंतर, आपले दोन्ही देश प्रगल्भपणे बदलले आहेत. आपण स्वतःमध्ये, आपले संबंध, आपले दुवे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे; म्हणून, समकालीन युगासाठी आपण भागीदारी तयार करणे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये आपण नवीन अभिसरण शोधू पाहत आहोत,’ जयशंकर म्हणाले.
जयशंकर हे ब्रिटनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ज्याचा समारोप १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ब्रिटनचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली.

Exit mobile version